शासनाकडून वारंवार थर्माकॉलच्या युज ॲण्ड थ्रो वस्तूंवर बंदी आणली जाते. काही काळ टिकते आणि पुन्हा सगळे नियम धाब्यावर बसवून थर्माकॉलच्या प्लेट, चहाचे कप बाजारात आणि मग नंतर आपल्या घरात दिसू लागतात. घरात लहान- मोठे कार्यक्रम असले की या डिशचा वापर हमखास केला जातो. कारण इकोफ्रेंडली डिस्पोजेबज प्लेट्स आणि डिश (plastic disposable plates and cups) जरा महाग पडतात. त्या तुलनेत थर्माकॉलच्या प्लेट (thermocol dish) आणि कप स्वस्त पडत असल्याने मग त्यांचा सर्रास वापर केला जातो. थंड पदार्थ घेण्यासाठी या डिश आणि कप वापरणे एकवेळ ठिक आहे, पण त्यात जर तुम्ही गरमागरम पदार्थ, चहा- कॉफी घेत असाल तर मात्र ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
थर्माकॉलच्या डिशमध्ये, कपमध्ये गरम पदार्थ खाण्याचे धोके१. थर्माकॉल प्लेट, डिश बनविण्यासाठी केमिकल्सचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो. जेव्हा या डिशमध्ये किंवा कपामध्ये आपण गरम पदार्थ टाकतो, तेव्हा त्या पदार्थाची आणि केमिकल्सची रिॲक्शन होते आणि खाद्यपदार्थांसोबत केमिकल्सचे अंश त्यांच्या नैसर्गिक स्वरुपात आपल्या पोटात जातात. वारंवार असे होत गेले तर ते कॅन्सरचे (can be the reason for cancer) कारण ठरू शकते. २. या प्लेट आणि कप बनविण्यासाठी पॉलीस्टिरिन वापरले जाते. गरम पदार्थांसोबत ते आपल्या पोटात जाते. त्यामुळे थकवा येणे, पोटदुखी, हार्मोन्सचे असंतुलन, स्नायुंमध्ये वेदना असा त्रास जाणवू शकतो.
३. थर्माकॉलच्या प्लेट आणि कप यांच्यातून अन्नपदार्थ गळून नयेत, यासाठी सगळ्यात वरतून त्यांना व्हॅक्स लावून कोटींग केलं जातं. त्याचाही काही अंश अन्नपदार्थांच्या माध्यमातून आपल्या पोटात जातोच. वारंवार अशा पद्धतीने व्हॅक्स पोटात जाणे, आरोग्यासाठी निश्चितच पोषक नाही.४. या वस्तूंमध्ये मेट्रोसेमिन, बिस्फिनोल आणि इथाईल डेक्झिन असे केमिकल्स असतात. जे गर्भवती स्त्रियांसाठी आणि त्यांच्या बाळासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी शक्यतो अशा डिस्पोजेबल वस्तूंचा वापर टाळावाच.
५. या वस्तूंमधले हानिकारक पदार्थ वारंवार पोटात गेल्याने किडनी, लिव्हर या अवयवांवर ताण येतो. त्यांच्यावर वारंवार येणारा ताण त्यांच्या कार्यात अनेक अडथळे आणतो. त्यामुळे मग या अवयवांचा कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.