Join us  

केस आहेत की कमाल! ७ फूट ९ इंच केस, भारतीय महिलेचे लांब केसांचे गिनिज रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 1:03 PM

Uttar Pradesh Woman Smita Shrivastav Achieves Guinness World Record for Longest Hair : केस वाळवणे, विंचरणे आणि त्यांची हेअरस्टाईल करणे यासाठी त्यांना तब्बल ३ तास लागतात.

केस हे महिलांच्या सौंदर्याचे प्रतिक आहे हे जरी खरे असले तरी त्यांची काळजी घेणे हे एक महत्त्वाचे काम असते. केस विंचरणे, त्यांना तेल लावणे, गुंता काढणे आणि ते धुणे, वाळवणे अशा सगळ्याच गोष्टी केसांची काळजी घेण्यामध्ये येतात. तसेच या केसांमध्ये कोंडा होऊ नये, ते गळू नयेत आणि छान राहावेत यासाठीही आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. या सगळ्या गोष्टींचा ताण होऊ नये म्हणून आपण केस शक्यतो लहान ठेवतो. पण मोठे केस हे कधीही सुंदरच दिसतात यात शंका नाही. मोठे केस असलेल्यांकडे आपण आश्चर्याने पाहतो पण कसे सांभाळत असतील अशी चिंताही व्यक्त करतो. उत्तर प्रदेशातील प्रयागराज एका महिलेचे केस इतके लांब आहेत की या केसांमुळे तिची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली (Uttar Pradesh Woman Smita Shrivastav Achieves Guinness World Record for Longest Hair).

(Image : Google)

 स्मिता श्रीवास्तव असे या महिेचे नाव असून तिच्या केसांची लांबी ७ फूट ९ इंच इतकी आहे. स्मिता ४६ वर्षांच्या असून २३६.२२ सेंटीमीटर इतके लांब त्यांचे केस आहेत. आता इतके लांब केस म्हटल्यावर ते धुण्यासाठी किती वेळ आणि कष्ट लागत असतील याची आपण कल्पनाच न केलेली बरी. तर हे केस धुण्यासाठी स्मिता यांना साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो. इतकेच नाही तर हे केस वाळवणे, विंचरणे आणि त्यांची हेअरस्टाईल करणे यासाठी त्यांना तब्बल ३ तास लागतात. म्हणजे त्यांचा आयुष्यातला कितीतरी वेळ आपल्या केसांची काळजी घेण्यातच जातो. 

स्मिता यांना आपल्या केसांबाबत खूप कौतुक आहे त्यामुळे वयाच्या १४ व्या वर्षापासून आतापर्यंत त्यांनी आपले केस इतके लांब वाढवले आहेत. केसांबाबत आत्मियता असल्याने तुटलेले किंवा गळालेले केस फेकून न देता एका पिशवीमध्ये साठवून ठेवतात. स्मिता यांनी आतापर्यंत आपल्या दुसऱ्यागर्भधारणेच्या वेळी एकदाच केस कापल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी तब्येत ठिक नसल्याने आपल्याला केसांची काळजी घेणे जमत नव्हते तेव्हा १ फूट केस कापल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या केसांमुळे लोक आपल्यासोबत फोटो काढतात आणि कौतुक करतात त्यामुळे छान वाटते. तसेच गिनिज बुकमध्ये नोंद झाल्याने आपल्याला विशेष आनंद झाल्याचेही स्मिता म्हणाल्या...

 

टॅग्स :सोशल व्हायरलगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड