Join us

करीना म्हणाली, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सैफू! आणि सैफ काय म्हणाला? तीच ती घरोघरचीच कथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2024 18:23 IST

Valentine's Day 2024: Saif Ali Khan's Hilariously Indifferent Reply To Kareena Kapoor's Wish : करीना शॉक्ड-सैफ रॉक्ड, व्हॅलेण्टाइन डे निमित्त शुभेच्छा देऊनही सैफकडून मिळाली अशी प्रतिक्रिया की..

व्हॅलेण्टाइनचा गुलाबी माहोल सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. फक्त सामान्यच नाही तर, सेलिब्रेटी देखील गुलाबी रंगात रंगले आहेत. काही बॉलीवूड कपल्सने आपल्या पार्टनरसोबतचे हटके फोटो शेअर केलेत तर, काहींनी थेट इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या. मात्र, याच दरम्यान बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूरने (Kareena Kapoor) अशी एक पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून नेटकऱ्यांचे हसू अनावर झाले आहे. करीना-सैफची जोडी बी-टाऊनमधली फेमस जोडी आहे. करीना कायम सैफसोबतचे (Saif Ali Khan) फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते (Valentine's Day).

व्हॅलेण्टाइन दिनानिमित्त करीनाने नवऱ्याला शुभेच्छा तर दिल्या, पण सैफची प्रतिक्रिया ही लक्षवेधी ठरत आहे, जे पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही(Valentine's Day 2024: Saif Ali Khan's Hilariously Indifferent Reply To Kareena Kapoor's Wish).

करीनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये करीनाने नवऱ्याला म्हणजेच सैफला व्हॅलेण्टाइन डे च्या शुभेच्छा दिल्या. पण सैफने प्रतिक्रियेत भन्नाट उत्तर दिलं आहे. पोस्टमध्ये करीना-हॅपी व्हॅलेण्टाइन डे सैफू. सैफ-ओके.' करीनाने अगदी प्रेमाने सैफला व्हॅलेण्टाइन डे शुभेच्छा दिल्या, पण त्याने प्रतिक्रिया देताना फक्त ओके म्हटले आहे. त्यामुळे सैफचा हा उत्साह पाहून, नेटकऱ्यांना हसू अनावर झाले आहे.

लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर अर्शद वारसीने लग्न केले रजिस्टर्ड, पण इतक्या उशीरा का?-अर्शद सांगतो..

लग्नाला झाले ११ वर्ष पूर्ण

'भाभी मोटी लग रही हो!’ म्हणणाऱ्या ट्रोलरला बुमराहची पत्नी संजना गणेशनने खडसावले, म्हणाली..

अभिनेता सैफ अली खान सोशल मिडियाचा वापर करत नाहीत. त्यामुळे पत्नी करीना फॅमिलीचे फोटो शेअर करत अपडेट देत असते. त्यांनी ११ वर्ष सुखी संसार केला असून, त्यांना २ मुलं आहेत. लग्नाआधी करीना आणि सैफ अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये देखील एकत्र दिसतील.

टॅग्स :व्हॅलेंटाईन्स डेकरिना कपूरसैफ अली खान