आज सगळीकडे व्हॅलेण्टाइन्स डे. (Valentines day vial video) कपल्स आपल्या पार्टनरला गुलाब किंवा भेटवस्तू देऊन आजचा दिवस साजरा करतात. सोशल मीडियावर व्हॅलेण्टाइन्स डेचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असताना आता एक 'रोज पकोडा'चा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. आतापर्यंत तुम्ही गुलाबाच्या अनेक रेसेपीज चाखल्या असतील पण तळलेल्या गुलाबाचा व्हिडिओ याआधी कधीही पाहिला नसेल. (Rose pakode on valentines day vial video) मात्र गुलाबाच्या फुलाची थेट भजी करण्याचा हा प्रयोग अजब आहे.
तुमचा विश्वास बसणार नाही पण एका ब्लॉगरनं खास व्हॅलेण्टाइन्स डेच्या दिवशी गुलाबाचे फुल तळून त्याचं भजं केलं आहे. एक मोठं गुलाब सगळ्यात आधी बेसन पीठात घोळवलं. त्यानंतर गरम तेलात भजीसारखं तळलं. नाजूक गुलाबाला असं उकळत्या तेलात तळून काय चव आली असेल जिभेवर ते मात्र ठाऊक नाही.
याआधीही पेस्ट्री पकोडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, याच कारणामुळे कोविड पूर्णपणे जात नाहीये. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की पेस्ट्रीच्या तुकड्याला बेसन पिठात घोळवताना एक व्यक्ती दिसते. एखाद्या भजीप्रमाणे पेस्ट्री तळली जाते. नंतर ती व्यक्ती ही पेस्ट्री खाण्याचा प्रयत्न करते. पेस्ट्री पकोडाचा हा प्रयोग नेटिझन्सना फारसा आवडलेला दिसत नाहीये. ही पेस्ट्री खाऊन पाहिल्यानंतर त्या तरूणानं नकारात्मक रिएक्शन दिलेली पाहू शकता.