Join us  

भाजीवाल्या ताई झाल्या डिजिटल स्मार्ट! QR कोडची कमाल, पाहा व्हायरल व्हिडिओ,म्हणाल क्या बात है..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 3:42 PM

Vegetable selling lady qr code jugaad : डिजिटल पेमेंटचे स्टिकर त्यांनी ज्या क्रिएटिव्ह पद्धतीने लावले ते कौतुकास्पद आहे.

 भारतभरात डिजिटल पेमेंट इको सिस्टिममुळे आपल्या रोजच्या जगण्यातील व्यवहाराची पद्धत बदलली आहे. किरणामालाच्या दुकानापासून स्ट्रिट फूडपर्यंत सगळेचजण ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यासाठी तयार असतात. (Vegetable selling lady qr code jugaad)  ग्राहकही आपला फोन काढला की क्यूआर कोड स्कॅन करून २ मिनिटांत  पेमेंट करून मोकळे होतात.

याचा एक सरळ-सोपा फायदा म्हणजे सुट्टे नाहीत म्हणून आपलं काम अडून राहत नाही आणि विक्रेत्याही सुट्टे पैसे देण्याचं टेंशन येत नाही. बरेच विक्रेते आपला क्यू आर कोड स्किटरच्या स्वरूपात मोठ्या  कागदावर प्रिंट करून भिंतीवर चिकटवतात तर काहीजण मशीनवर लावतात. (Vegetable selling lady qr code jugaad for digital payment gets over 12 million views watch)

सध्या सोशल मीडियावर एका भाजीवाल्या मावशींचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी भाजीचे पैसे ऑनलाईन स्वीकारण्यासाठी एक मस्त शक्कल लढवली आहे. हा जुगाड पाहून सगळेचजण चकीत झाले आहेत. या मावशी कोणत्याही दुकानात नाही तर रस्त्यावर भाजी विकण्यास बसल्या आहेत. (Vegetable Vendor's 'Desi Jugaad' for Accepting Online Payments Is Viral)

अशावेळी भाजीचे पैसे गुगलपे, फोन पे च्या माध्यमातून घेण्यासाठी त्यांनी सुद्धा स्कॅनर स्टिकर लावले आहे. गंमत अशी की  त्यांनी स्कॅनर चिकटवण्यासाठी जी जागा निवडली ती चर्चेचा विषय ठरली आहे. भाजीच्या टोपलीच्या खाली त्यांनी हे स्नॅकर चिकटवलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी या महिलेच्या क्रिएटिव्हीटीचं कौतुक करत विनोदी कमेंट्स  केल्या आहेत.

घरात सतत ढेकूण होतात? ५ सोपे उपाय, एकही ढेकूण दिसणार नाही, परत होणार नाहीत...

हा व्हिडिओ महाराष्ट्र.फार्मर यार पेजवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. काही मिनिटातच या रिलला १२.६ मिलियन पेक्षा जास्त व्हिव्ह आणि १.४ मिलियन लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे 'स्मार्ट माऊशी' एक  व्यक्ती या माऊशींकडून शेंगदाणे विकत घेत आहे.

पोट सुटलंय, फिगर बेढब दिसते? २१ दिवसांत वजनात दिसेल फरक, तज्ज्ञ सांगतात 3 सोपे उपाय

शेंगदाणे घेतल्यानंतर त्याने पेमेंटसाठी QR कोड स्टिकर मागितले तेव्हा ते त्यांना अनपेक्षित ठिकाणी दिसले. वजनाच्या भांड्याच्या खाली ते स्टिकर होते. डिजिटल पेमेंटचे स्टिकर त्यांनी ज्या क्रिएटिव्ह पद्धतीने लावले ते कौतुकास्पद आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल