सोशल मिडियावर दिवसाला शेकडो रिल्स, व्हिडिओ शेअर केले जातात. त्यातले काही व्हिडिओ निव्वळ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडिओ आपल्याला खरंच जागरुक करणारे असतात. पापड कसे तयार केले जातात, याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर बराच व्हायरल झाला आहे (Very unhygienic way of making papad). या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पापड तयार केले जात आहेत, ते पाहून यानंतर विकतचे पापड घ्यायचे की नाही हा विचार नक्कीच प्रत्येकजण करेल. (Viral Video Of Making Papad stunned internet)
कशा पद्धतीने तयार केले पापड?
dabake_khao या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्या महिला उडदाचे पापड करत आहेत की तांदळाचे ते स्पष्ट कळत नाहीये. पण जो कोणता पापड तयार होतो आहे, तो नेमका कशा पद्धतीने केला जातो आहे, ते पाहायलाच पाहिजे.
फक्त ३ पदार्थ वापरून घरीच तयार करा होळीचे रंग- बघा ऑर्गेनिक रंग बनविण्याची सोपी पद्धत
सुरुवातीला त्यांनी परातीपेक्षाही मोठ्या आकाराचे पापड केले आणि ते एका प्लास्टिकवर वाळत टाकले. ज्या ठिकाणी पाय दिले गेले, त्या ठिकाणीही पापड वाळत घातले गेले.
हिरव्यागार कैरीचा आंबट- गोड, चटपटीत मेथांबा! जेवणात येईल रंगत- बघा एकदम सोपी रेसिपी
नंतर वाळत घातलेले मोठमोठाले पापड अर्धवट सुकल्यानंतर एकावर एक रचल्या गेले. ते जवळपास २० ते २५ पापड असावेत. त्यानंतर त्यावर एक भांडं ठेवलं. त्या भांड्यावर एक महिला उभी राहिली आणि तिने त्या भांड्यावर पायाने जोर दिला. यानंतर अशाच पद्धतीने तिने मोठ्या पापडाचे अनेक लहान लहान पापड केले.
व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात..
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी खूप वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत. काही जणांना हा गलिच्छपणा अजिबात आवडलेला नाही.
कैरीचं चटकमटक इन्स्टंट लोणचं करा फक्त ५ मिनिटांत, बघा चटपटीत लोणच्याची सोपी रेसिपी
तर काही जण म्हणत आहेत की विकत मिळणाऱ्या फास्टफूड, स्ट्रिटफूडच्या स्वच्छतेपेक्षा हे कितीतरी बरे म्हणावे असे आहे. 'Hygiene is a crime in india', ' Taste kaha hai Taste yaha hai' अशा आशयाच्या मजेशीर कमेंटही अनेकांनी दिल्या आहेत.