Lokmat Sakhi >Social Viral > विकी कौशल म्हणतो "मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है...", बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ

विकी कौशल म्हणतो "मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है...", बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ

Vicky Kaushal And Veena Kaushal: अभिनेता विकी कौशलने शेअर केलेला हा व्हिडिओ (viral video of doing champi) पाहून अनेक जण त्यांच्या आईला मिस करत आहेत.. तुम्ही पाहिला का कौशल मायलेकाचा हा प्रेमळ व्हिडिओ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 06:50 PM2022-11-03T18:50:28+5:302022-11-03T18:51:30+5:30

Vicky Kaushal And Veena Kaushal: अभिनेता विकी कौशलने शेअर केलेला हा व्हिडिओ (viral video of doing champi) पाहून अनेक जण त्यांच्या आईला मिस करत आहेत.. तुम्ही पाहिला का कौशल मायलेकाचा हा प्रेमळ व्हिडिओ?

Vicky Kaushal and his mother Veena Kaushal's loving video, Vicky Kaushal enjoying head massage from his mother | विकी कौशल म्हणतो "मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है...", बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ

विकी कौशल म्हणतो "मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है...", बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ

Highlightsकौशल मायलेकाचा हा प्रेमळ व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या आईची आठवण आली.

अभिनेत्री कतरिना कैफच्या सासुबाई म्हणजे अभिनेता विकी कौशल याची आई वीणा कौशल (Vicky Kaushal And Veena Kaushal) यांच्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या चर्चा होत असतात. कधी त्यांची घरातली शिस्त आणि प्रेमळ स्वभाव यांच्याविषयी चर्चा होते, तर कधी खास कतरिनासाठी (Katrina Kaif's mother in law) त्या कशा वेगवेगळ्या डाएट रेसिपी तयार करतात, याविषयीचे किस्से ऐकू येतात. एकंदरीतच वीणा कौशल यांच्या विषयी असं बोललं जातं की घरातली सगळीच लोक आपापल्या क्षेत्रात प्रगती करत असताना, आपल्याला क्षेत्रात धावत असताना वीणा या नेहमीच त्यांच्या कुटूंबियांच्या मागे भक्कम आधार म्हणून उभ्या असतात.

 

अशा या कुटूंबवत्सल व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस नुकताच उत्साहात पार पडला असून त्यानिमित्ताने विकी कौशल याने त्याच्या आईला म्हणजेच वीणा यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हिवाळ्यात खायलाच हवी बाजरीची पारंपरिक खमंग खिचडी, बेत खास आणि रेसिपी झकास

शुभेच्छा देण्याची विकीची पद्धत नेटिझन्सला भारीच आवडली असून कौशल मायलेकाचा हा प्रेमळ व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या आईची आठवण आली. विकीने आईच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये त्याची आई त्याच्या डोक्याला तेलाने मालिश करताना दिसते आहे. 

 

"Happy Birthday Maa. Aapki maar aur maalish dono mein sukoon hai! Love you...", असं कॅप्शन विकीने या व्हिडिओला दिलं असून हा व्हिडिओ केवळ ४ तासांतच तुफान व्हायरल झाला आहे.

चिमुकलीची बघा करामत! मांजरीला शिकवलं ट्रेडमिलवर धावायला, ट्रेडमिलवरचा 'कॅट'वॉक.. व्हायरल व्हिडिओ

एवढ्या कमी वेळात या व्हिडिओला १० लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. आईच्या हाताने डोक्याला मालिश करून घेणं, तो खरोखरच किती एन्जॉय करतो आहे आणि त्याला किती समाधान मिळत आहे, हे विकीच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसून येतं. कारण आई मालिश करत असताना त्याचे डोळे अलगद मिटले जात असून चेहऱ्यावर अतिव आनंदाचं हास्य फुललं आहे. 
 

Web Title: Vicky Kaushal and his mother Veena Kaushal's loving video, Vicky Kaushal enjoying head massage from his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.