जुनं ते सोनं हे नेहमीच तुम्ही ऐकत आला असाल. काळाच्या ओघात तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होत आहे आणि ते सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आहेत. रेफ्रिजरेटरचे उदाहरण घेतले तर आता गरजेच्या बनलेल्या उपकरणात अनेक बदल झाले आहेत. दुहेरी दरवाज्यांपासून ते झटपट बर्फ तयार करणापर्यंत, फ्रीज हे आजकाल अतिप्रगत झाले आहेत. 1956 ची Frigidaire जाहिरात ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर, इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. (Video of 66 year old refrigerator goes viral internet cannot keep calm said this is better than our smart fridge)
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लॉस्ट इन हिस्ट्री नावाच्या पेजने ट्विटरवर शेअर केला आहे. क्लिपमध्ये दाखवलेली ब्लॅक अॅण्ड व्हाईट जाहिरात ही फ्रिजची आहे. या फ्रीजमध्ये बाटल्या, चीज आणि अगदी बटरसाठी दरवाज्यावर भरपूर कप्पे होते. फळे आणि भाजीपाला वेगळे ठेवण्यासाठी कप्पे होतेच एवढेच नाही तर फ्रीजचे शेल्फ पूर्णपणे समोरच्या दिशेने फिरवता येतात आणि तिथे एक आइस-क्यूब इजेक्टर देखील असते.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "हा 66 वर्षे जुना फ्रीज माझ्याकडे असलेल्या फ्रीजपेक्षा चांगला का आहे?" ऑनलाइन शेअर केल्यापासून हा व्हिडिओ 11.2 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. एवढा प्रगत विंटेज फ्रीज पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले आणि आता त्यांनाही असा फ्रीज मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. एका युजरनं लिहिले, "जेव्हा गोष्टी आजच्यापेक्षा चांगल्या बनवल्या गेल्या होत्या." दुसर्या यूजरने लिहिले, "हा जुना रेफ्रिजरेटर आजच्या फ्रीजपेक्षा खूप चांगला आहे. मला एक मिळेल का? मला ते खूप आवडले."