Join us

कमाल! ऋतिक रोशनला टक्कर देईल या मावशींचा ब्रेक डान्स; व्हिडिओ पाहून तोंडात बोट घालाल;

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 15:07 IST

Viral Video : रॉकिंग डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक काकू कपड्याच्या दुकानात नाचताना दिसत आहे.

डान्सची क्रेझ तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच पाहायला मिळत आहे. नाचण्यासाठी वय नसते हे सोशल मीडियाच्या जगानेही सिद्ध केले आहे. व्यक्ती कोणत्याही वयात कोणत्याही प्रकारचे नृत्य करू शकते. इंटरनेटवर दररोज असे हजारो व्हिडिओ शूट करून चर्चेत येतात. (Aunty Dancing Video) ज्यामध्ये लहान मुले, तरुण आणि वृद्ध लोकांच्या जबरदस्त डान्सचे व्हिडिओ लोकांना चकीत करतात. असाच एक रॉकिंग डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक काकू कपड्याच्या दुकानात नाचताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये आंटीने हृतिक रोशनच्या  (Hrithik Roshan) 'एक पल का जीना' गाण्यावर डान्स करून सर्वांना आश्चर्यचकित केले. (Viral Video of Dancing Aunty) सध्या सोशल मीडियावर एका मावशीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता हृतिक रोशनच्या 'एक पल का जीना' या गाण्यावर ती जोरदार मूव्हद्वारे  प्रॅक्टिस करत आहे.   memecentral.teb नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Reels) अपलोड करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काकू जी रॉकस्टार'. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. युजर्स या व्हिडीओवर भरभरून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'आंटी भारी ड्रायव्हर निघाली.' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'अपकमिंग सेलिब्रिटी.' 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया