Lokmat Sakhi >Social Viral > होमवर्क करायचा राहिला तर बहाद्दराने शाळेत जाताना चालत्या स्कूटीवर सुरु केला अभ्यास, पाहा व्हिडिओ

होमवर्क करायचा राहिला तर बहाद्दराने शाळेत जाताना चालत्या स्कूटीवर सुरु केला अभ्यास, पाहा व्हिडिओ

Student Doing Homework on Scooty : काहीजण गृहपाठ पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणी धावतात. गृहपाठ पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलाचा असाच एक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:05 AM2022-07-26T09:05:00+5:302022-07-26T14:08:49+5:30

Student Doing Homework on Scooty : काहीजण गृहपाठ पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणी धावतात. गृहपाठ पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलाचा असाच एक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video of child student doing homework on scooty in middle of a busy road goes viral | होमवर्क करायचा राहिला तर बहाद्दराने शाळेत जाताना चालत्या स्कूटीवर सुरु केला अभ्यास, पाहा व्हिडिओ

होमवर्क करायचा राहिला तर बहाद्दराने शाळेत जाताना चालत्या स्कूटीवर सुरु केला अभ्यास, पाहा व्हिडिओ

सर्वांना आपले शाळेचे दिवस नेहमी आठवतात, कारण हे आयुष्यातील सोनेरी दिवस आहेत. मौजमजा, खोडसाळपणा आणि वेळेवर गृहपाठ पूर्ण करण्याची धडपड असते. काही शाळकरी मुलांना गृहपाठ पूर्ण न झाल्यास विविध सबबी सांगणेही चांगले माहीत असते. गृहपाठ नसेल झाला तर धाकधूक तर असतेच पण शिक्षकांना नवीन काय कारण सांगायचं याचा विचार मनात सुरू असतो. शिक्षकांनी पालकांना भेटायला बोलावलं तर... याची भिती वेगळीच. (Video of Young Student Doing Homework on Scooty in Middle of a Busy Road Goes Viral)

काहीजण गृहपाठ पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणी धावतात. गृहपाठ पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलाचा असाच एक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाळेचा गृहपाठ पूर्ण न केल्याने शिक्षकांचा ओरडा टाळण्यासाठी मूल अप्रतिम जुगाड करताना दिसत आहे. मुलगा आपल्या आईसोबत स्कूटीवरून शाळेत जात आहे. यादरम्यान, तो स्कूटीच्या मागील सीटवर बसून कॉपी आणि पेन काढून गृहपाठ पूर्ण करताना दिसत आहे. (Student Doing Homework on Scooty)

या व्हिडिओमध्ये मूल त्याच्या आईच्या मागे बसून स्कूटीवर गृहपाठ करत आहे. व्हिडिओला कॅप्शन दिलंय की, 'जेव्हा तुमचा रोल नंबर पहिला असेल आणि तुमचा गृहपाठ पूर्ण झाला नसेल', असे लिहिले आहे. गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मुलाचा हा जुगाड पाहून सोशल मीडिया यूजर्स विविध मजेशीर कमेंट करत आहेत. 

फ्रेंडशिपडेज नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हे कौशल्य फक्त मुलांमध्ये आहे, ते शेवटच्या क्षणापर्यंत लढतात'. दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'खरंच असं होतं'. त्याचबरोबर अनेक युजर्सनी स्मायली पोस्ट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आतापर्यंत हजारो लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  बॅक बेंचर थिंग्स अशी कमेंट एका युजरनं केली आहे 
 

Web Title: Video of child student doing homework on scooty in middle of a busy road goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.