Join us  

मुसळधार पावसात लागले लग्न, संकट आले तरी त्यांचे प्रेम डगमगले नाही.. व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2023 1:46 PM

The Power Of Love: Couple's Wedding In The Rain Touches Hearts Online : पाऊस आला, भर लग्नात विघ्न पण नवरानवरी मात्र एकमेकांच्या सोबतीने उभे राहिले.

'लग्न' ही प्रत्येकाच्या आयुष्यातली खूप महत्वाची आणि स्पेशल गोष्ट असते. प्रत्येक जोडपं आपल्या लग्नाचं प्लॅनिंग करतांना काहीतरी खास असावं असाच विचार करत असतात. चार चौघांपेक्षा आपलं लग्न कस सर्वात वेगळं आणि हटके होईल यासाठी जोडपं महिनोंमहिने आधी प्लॅनिंग करतात. सध्याचे लग्न सोहळे म्हणजे बुलेटवरुन नवरीच्या एंट्री पासून ते नाच गाणे, रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, नवऱ्याची हटके एंट्री, नातेवाईकांचे डान्स असे सगळे प्रकार आपण नक्कीच पाहिले असतील. 

आत्तापर्यंत आपण सोशल मीडियावर अशाच काही हटके लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील. त्यापैकीच हे एक लग्न. लग्न मंडपात उत्साहाचं वातावरण होत.. आता नवरा नवरी एंट्री घेऊन एकमेकांना वरमाला घालणार... त्यांच्या एंट्रीला रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, आणि नातेवाईकांचे सुंदर नाच गाणे असे सगळे ऑल सेट, रेडी स्टेडी गो म्हणण्यापर्यंत सगळे उत्तम सुरु होते. परंतु या जोडप्याच्या एंट्रीच्या वेळी अचानक आभाळातून मुसळधार बरसणाऱ्या पावसाचीच एंट्री झाली. मग काय घडलं ? नेमकी काय तारांबळ उडाली ते पाहूयात(Video Of Couple Getting Married Amidst Pouring Rain Goes Viral, Netizens Call It A 'Dream).  

नेमक या लग्नांत नवरा - नवरीच्या एंट्रीला असं काय झालं ?

@anchor_jk या इंस्टाग्राम अकाउंटवरून नुकत्याच एका लग्नातील नवरा - नवरीच्या एंट्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये, आपल्याला भव्यदिव्य रोषणाई ने मोठा शाही स्टेज सजवला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला नवरा - नवरी एकमेकांच्या हातात हात देऊन एक झकास एंट्री करताना दिसत आहेत. पण ही एंट्री इतकीच नव्हती... त्यांच्या या हटके एंट्रीला नातेवाईकांसोबतच धो - धो पावसाने देखील त्यांचे स्वागत केल्याचे दिसत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे इलेकट्रीक शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून आयत्यावेळी स्टेजवरील सगळी रोषणाई घालवण्यात आली होती. असे असूनही या जोडप्याने आपली एंट्री मात्र कोणत्याही परिस्थितीत थांबवली नाही. त्यांच्या एंट्रीच्या वेळी नातेवाईकांनी मिळून एक झक्कास डान्स परफॉर्मन्स बसवला होता. ते देखील या जोडप्याचा उत्साह बघून अधिक उत्स्फूर्तपणे नाचू लागले. अशा अवेळी आभाळातून बरसणाऱ्या वरुण राजाची कोणतीही तमा न बाळगता हे जोडपे मोठ्या दिमाखात शाही स्टेजवर अवतरले. इतकेच नव्हे तर हे जोडपे भर पावसात एकमेकांना वरमाला घालून विवाहबद्ध झाल्याचे व्हिडिओच्या शेवटी दिसत आहे.      

भीती वाटली होती मी ‘तिला’ गमावणार तर नाही! -प्रियांका चाेप्रा सांगते लेकीसाठी काळीज तुटत होतं ते दिवस...

बायांनो ऐका, नवऱ्याला पाळणाघरात ठेवा आणि मस्त एकटीने फिरायला- शॉपिंगला-मजा करायला जा!

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ? 

हा व्हिडीओ नुकताच एक दिवसापूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यापासून १.३ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी बघताच त्याच्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, चक्क देवच त्यांना आशीर्वाद देत आहे. तर दुसऱ्या युजरने नवऱ्याला उद्देशून म्हटले आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही, तू मागे फिरुन लग्न करण्यापासून वाचू शकतो, अशी हसायला भाग पाडणारी कमेंट सुद्धा आली आहे. ओह्ह्ह!! माय गॉड... हे तर एका स्वप्नाप्रमाणेच आहे... देव तुम्हा दोघांना आशीर्वाद देवो... अशी कमेंट तिसऱ्या युजरने केली आहे. जर तुम्हांला वाटत असेल की या अचानक येणाऱ्या पावसाने आमच्या सगळ्या प्लॅनिंगचा भट्टयाबोळ झाला आहे, तर तसे नाही खरं तर निसर्गाने तुम्हा दोघांना कायम एकत्र राहण्याचा आशीर्वाद दिला आहे, अशी कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे. "या पावसातही नृत्य सादर करणाऱ्या बॅकग्राउंड डान्सर्सचे कौतुक, आणि जोडप्यालाही खूप खूप शुभेच्छा. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या लग्न सोहोळ्याचा आनंद घेतला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरल