Lokmat Sakhi >Social Viral > भेंडी नुडल्सनंतर आता मार्केटमध्ये आलाय 'भिंडी' समोसा, सारण म्हणून समोशात भेंडी? काय हा प्रकार..

भेंडी नुडल्सनंतर आता मार्केटमध्ये आलाय 'भिंडी' समोसा, सारण म्हणून समोशात भेंडी? काय हा प्रकार..

Video of man selling bhindi samosa in Chandni Chowk goes viral. Kuch bhi, says Internet सोशल मीडियावर व्हायरल झालाय समोसा भेंडी! तुम्ही ट्राय करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 12:02 PM2023-04-10T12:02:45+5:302023-04-10T12:04:42+5:30

Video of man selling bhindi samosa in Chandni Chowk goes viral. Kuch bhi, says Internet सोशल मीडियावर व्हायरल झालाय समोसा भेंडी! तुम्ही ट्राय करणार का?

Video of man selling bhindi samosa in Chandni Chowk goes viral. Kuch bhi, says Internet | भेंडी नुडल्सनंतर आता मार्केटमध्ये आलाय 'भिंडी' समोसा, सारण म्हणून समोशात भेंडी? काय हा प्रकार..

भेंडी नुडल्सनंतर आता मार्केटमध्ये आलाय 'भिंडी' समोसा, सारण म्हणून समोशात भेंडी? काय हा प्रकार..

भारतीय स्ट्रीट फूड जगभरात फेमस आहे. संध्याकाळ झाली की, लोकं स्ट्रीटफूडवर गर्दी करतात. पाणी - पुरी, वडापाव, चायनीज असे अनेक पदार्थ खाण्यासाठी खवय्ये गर्दी जमवतात. पण सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, स्ट्रीटफूडवाले पदार्थात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतात. काहींना हे पदार्थ आवडतात तर काहींना नाही.

हे विचित्र कॉम्बिनेश फूड सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतात. सध्या भेंडी समोसा हा पदार्थ व्हायरल होत आहे. समोसा म्हटलं की, आत मसालेदार बटाट्याचे सारण, बाहेर खुसखुशीत मैदाची पुरी, सोबत लाल - हिरवी चटणी. समोसा गरमा - गरम खायला अप्रतिम लागतो. पण त्यात जर कोणी भेंडी अॅड केली तर? भेंडीच्या सारणासह समोस्याची चव कशी लागेल याचा विचारच करवत नाही. पण हा सामोसा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे(Video of man selling bhindi samosa in Chandni Chowk goes viral. Kuch bhi, says Internet).

गेल्या काही दिवसांपासून भेंडी समोसाची चर्चा होत आहे. या नवीन प्रकारच्या समोसाचा व्हिडीओ फूड लव्हर नावाच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. दिल्लीचे फूड हब म्हटल्या जाणाऱ्या चांदनी चौकात भेंडी समोसा विकला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, एका स्टॉलवर एक व्यक्ती या समोशाच्या आत भेंडीचे सारण असल्याचे दाखवत आहे. समोसे विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार, भेंडी अशा प्रकारे शिजवली जाते की त्यात चिकट तार राहणार नाही.

पंख्यावर धुळीचे थर, काळाकुट्ट झालाय? २ घरगुती सोपे उपाय, डाग गायब-पंखे दिसतील चकाचक

भेंडी समोसासह छोले - बटाट्याची भाजी

विक्रेता भेंडी सामोसाला कुसकरून त्यावर छोले बटाट्याची भाजी देत आहे. त्यासोबत हिरवी आणि लाल चटणी देखील देत आहे. या समोस्याची किंमत ३० रुपये आहे. समोसे विकणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला उभे असलेले लोकही, हा नवीन प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. याआधी भेंडी नुडल्स हा पदार्थ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता, त्यानंतर श्रीनगरमधील बिर्याणी समोसाही व्हायरल झाला होता.

अरे हे काय खाताय? ट्विटरवर रंगली ‘भेंडी नुडल्स’ची चर्चा, लोक म्हणाले बिचारी भेंडी

सध्या लोकांना कोणत्याही कॉम्बिनेशसह काहीही खाण्याची सवय झाली आहे. सध्या या अतरंगी पदार्थाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Web Title: Video of man selling bhindi samosa in Chandni Chowk goes viral. Kuch bhi, says Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.