बॉलिवूड मधील अभिनेत्री म्हटलं की ती दिसायला सुंदर, गोरी, चाफेकळी नाक, कमनीय बांधा असणारी अशीच असली पाहिजे, हा जणू अलिखित नियमच आहे. सध्याच्या या झिरो फिगर ट्रेंडमध्ये एखादी अभिनेत्री जर अंगाने जाडजूड असेल तर तिला कोण - कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल, हे सांगता येत नाही. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला जर असं वाटत असेल की हे केवळ आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठीच आहे तर असं अजिबात नाही. अनेक सेलिब्रिटींनाही याचा सामना करावा लागला आहे. बॉडी शेमिंगच्या नावाखाली आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना ट्रोल करण्यात आले आहे(Vidya Balan Reveals Being Angry With Her Mother For Making Her Diet Early On In Life: She Feared I Would Be Judged).
भारती सिंह, शहनाझ गिल, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, हुमा कुरेशी, ऐश्वर्या रॉय, विद्या बालन यांसारख्या अनेक मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्री आजपर्यंत त्यांच्या जाडेपणामुळे खूपच ट्रोल झाल्या आहेत. या सगळ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी बॉडी शेमिंग व तिच्या जाडेपणामुळे ट्रोल झालेलं सर्वात मोठं नाव म्हणजे विद्या बालन एक काळ असा होता जेव्हा विद्या बालन (Vidya Balan) स्लिम दिसण्याचा (Vidya Balan reveals she used to be very angry with her mom: ‘She was constantly doing things to make me lose weight’) अतोनात प्रयत्न करत होती. पण कालांतराने तिने केवळ तिच्या शरीराचा स्वीकारच केला आणि ती शरीराच्या सकारात्मकतेबद्दल सर्वत्र बोलू लागली. पूर्वी विद्या बालनला तिच्या वाढलेल्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे अनेक टोमणे ऐकावे लागायचे. लोक तिला अनेकदा ट्रोल करायचे. विद्या बालनने लाइफस्टाइल कोच ल्यूक कौटिन्हो यांच्या मुलाखतीत शरीराच्या नकारात्मकतेबद्दल सांगितले आणि ती त्यावर मात करण्याचा कसा प्रयत्न करते, हे देखील तिने अतिशय दिलखुलासपणे शेअर केले आहे(Vidya Balan Reveals Her Mother Made Her Follow Diet Early On In Life: 'I Grew Up Hating My Body').
आपल्या वजनाबाबत किंवा जाडेपणाबद्दल सांगताना विद्या म्हणते...
आजपर्यंत माझ्या शरीरावरुन तसेच जाडेपणावरुन माझ्यावर अनेक टिका झाल्या आहेत. सतत माझ्यावर होणाऱ्या या टीका सहन करणे माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. माझ्यावर सतत होणाऱ्या या टिकेमुळे मी माझ्या शरीराचा कायमच द्वेष करत आले होते. परंतु आता मी माझ्या शरीराला आहे तशाच स्वरुपात स्वीकारले आहे. बॉडी शेमिंगबद्दल विद्या म्हणते, ती तिच्या बॉडीमुळे काहीवेळ खूपच अस्वस्थ होते. मी माझ्या शरीरात खूप बदल करण्याचे ठरवले,पण मी माझ्या शरीरासोबत जगायला शिकसे. माझ्या शरीरात काही बदल होणार नाही म्हणून मी तसेच जगायला शिकले. माझ्या बॉडीवरून अनेकदा मला टोमणे मारले जायचे. ही कशी आहे दिसायला. अशा कमेंट्स लोकं माझ्यावर करायचे. मी मात्र यावर खचून न जाता त्यावर मात केली. माझ्या शरीरावरून मला आई देखील बोलली होती. विद्या पुढे आपल्या मुलाखतीत म्हणाली, मला माझ्या शरीराची लाज वाटायची. मी या विचारात अनेक काळ संघर्ष केला होता. एकदा मला माझ्या शरीराचा देखील तिटकारा आला होता. ती या कारणामुळे अनेकदा आजारी देखील पडली होती. नंतर मला जाणवलं की, आपण या सगळ्यावर मेहनतीनं मात करायला हवी.
कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा..
म्हणून विद्या तिच्या आईचा राग - राग करत होती...
एका मुलाखती दरम्यान विद्याने सांगितले की, मी लहानपणापासूनच एक गुबगुबीत, जाडजूड मुलगी म्हणूनच माझ्याकडे पाहिले जायचे. इतरांनी तर तिच्या वजनावरुन तिच्यावर खूप टीका केली, एवढेच नव्हे तर तिची आई तिचे वजन कमी करण्यासाठी सतत तिला काही ना काही गोष्टी करायला सांगत असे. आई वडील हे नेहमी आपल्या मुलांच्या बाबतीत अतिशय काळजी करत असतात. परंतु लहान असताना माझे वजन कमी करण्यासाठी (Vidya Balan reveals she used to be very angry with her mom) माझी आई मला नेहमी वजन कमी करण्यासाठी डाएट, व्यायाम करायला लावत असे, तेव्हा मला आईच्या अशा वागण्याचा भरपूर (Here’s why Vidya Balan was always angry with her mother) राग येत असे. कदाचित तिला माझी खूप काळजी असेल म्हणून ती मला या सगळ्या गोष्टी करायला लावत असे.
वजन कमी करण्यासाठी सतत गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं का ? तज्ज्ञ सांगतात...
अशा प्रकारे ती नकारात्मकता आणि ट्रोल्सपासून स्वतःला वाचवते...
विद्या बालन म्हणाली की, कालांतराने मी या नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवायला शिकली आहे. उदाहरणार्थ, ती सोशल मीडियावरील कमेंट वाचत नाही. काही काळासाठी, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया कमेंट बॉक्स डिसेबल केला होता. याशिवाय विद्या बालन खऱ्या आयुष्यात अशा लोकांना टाळते जे तिला अस्वस्थ वाटण्यास भाग पाडतात. जो कोणी तिला अपमानित करण्याचा प्रयत्न करतो, विद्या त्यांच्यापासून एक प्रकारचे अंतर ठेवूनच राहते.
कॉफी प्या आणि वजन कमी करा ! आहारतज्ज्ञ सांगतात ४ प्रकारची कॉफी प्या, वजनाचा काटा हललाच समजा...