चित्रपटातली अभिनेत्री कशी अगदी स्लिम-ट्रिम असली पाहिजे, तिच्या अंगावर कुठेही मुठभरही मांस चढायला नको.. झिरो फिगरवाली असेल तर मग एकदम बेस्ट!! अशा दृष्टिकोनातून अभिनेत्रींना बघण्याचा जो जमाना होता किंवा आहे त्याच जमान्यात अभिनेत्री म्हणून विद्या बालन रुपेरी पडद्यावर आली आणि तिने वर्षांनुवर्षांपासून वजनाची, फिगरची चाकोरीच बदलून टाकली. शरीराने जशी आहे तशी ती लोकांसमोर आली आणि अभिनेत्री अशीही असू शकते, हे तिने ठासून दाखवून दिले. म्हणूनच तर आज विद्या बालन सगळ्या अभिनेत्रींपेक्षा वेगळी आहे. वजन आणि त्याभोवती फिरणारी मानसिकता याविषयीच ती काहीतरी महत्त्वाचं सांगते आहे..
तिच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग blackheart_2018 या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती सांगते की बहुतांश भारतीय लोकांना तुम्ही किती खुश आहात किंवा दुःखी आहात किंवा तुमची मानसिक, भावनिक परिस्थिती कशी आहे याविषयी काहीच घेणं देणं नसतं.
गणपतीचं डेकोरेशन आकर्षक होण्यासाठी खास टिप्स, झटपट होईल तयारी- मखर दिसेल सुंदर
कारण जेव्हा बऱ्याच दिवसानंतर एखादी व्यक्ती तुम्हाला भेटते तेव्हा तू कशी आहेस हे विचारण्यापेक्षा 'अरे तू किती जाड झालीस' किंवा 'अगं तू खूपच बारीक झालीस' ही दोनच वाक्य सगळ्यात आधी बोलली जातात. त्यामुळे ज्या व्यक्तीला हे प्रश्न विचारले जातात, ती अवघडून जाते. तिथेच तिचा कॉन्फिडन्स कमी होतो.
पण असं होऊ देऊ नका, असं विद्या बालन ठामपणे सुचवत आहे. कोणी तुम्हाला काहीही म्हणू द्या. त्याचा फार विचार करू नका. तुम्ही जशा आहात तसं स्वतःला स्वीकारा. आनंदात राहा.
बघा मॅट लिपस्टिकला कसा द्यायचा ग्लॉसी लूक! सणासुदीला कामी येणारी भन्नाट ट्रिक- लगेच पाहा
तुम्ही जर आहे त्या परिस्थितीत खुश असाल तर आपोआपच समोरचा व्यक्तीही तुम्हाला स्वीकारेल. त्यामुळे दुसरा तुम्हाला काय प्रश्न विचारतो तो महत्त्वाचा नाही. सगळ्यात महत्त्वाचा तुमचा आनंद आहे हे लक्षात घ्या.. विद्या सांगतेय त्या प्रकारचा विचार आपण केला तर नक्कीच स्वत:कडे, स्वत:च्या शरीराकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळू शकतो.