Lokmat Sakhi >Social Viral > आई, मला नवीन हृदय मिळणार! ६ वर्षांचा आजारी मुलगा जेव्हा हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला आनंदाची बातमी सांगतो..

आई, मला नवीन हृदय मिळणार! ६ वर्षांचा आजारी मुलगा जेव्हा हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला आनंदाची बातमी सांगतो..

6 Year Old Boys Gets Donor For Heart Transplant : ६ वर्षांचा मुलगा आपल्याला नवीन आयुष्य मिळणार म्हणून आनंदी झाला तो क्षण, व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:58 PM2024-08-31T12:58:42+5:302024-08-31T13:02:18+5:30

6 Year Old Boys Gets Donor For Heart Transplant : ६ वर्षांचा मुलगा आपल्याला नवीन आयुष्य मिळणार म्हणून आनंदी झाला तो क्षण, व्हायरल व्हिडिओ

Viral 6 Year Old Boys Gets Donor For Heart Transplant Surgery Emotional Video Goes Viral | आई, मला नवीन हृदय मिळणार! ६ वर्षांचा आजारी मुलगा जेव्हा हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला आनंदाची बातमी सांगतो..

आई, मला नवीन हृदय मिळणार! ६ वर्षांचा आजारी मुलगा जेव्हा हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला आनंदाची बातमी सांगतो..

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. हा व्हिडिओ एक ६ वर्षांच्या मुलाचा आहे. त्या मुलाचा निरागस आनंद आणि त्याची प्रतिक्रिया पाहून पाहणाऱ्या कुणालाही भरुन यावं. डोळ्यात पाणी आणणारे, जगण्याची उमेद सांगणारे असे व्हिडिओ पाहणाऱ्यालाही आनंद देतात. ( Viral 6 Year Old Boys Gets Donor For Heart Transplant Surgery Emotional Video Goes Viral)

हा ६ वर्षांचा मुलगा खूपच आजारी होता. त्याला हार्ट ट्रांसप्लांट करण्याची गरज होती. तो अनेक दिवसांपासून वाट पाहत होता की त्याला नवीन हृदय मिळेल आणि त्याला डोनर मिळाला. आपल्याला नवीन हृदय मिळणार आहे ही गोष्ट तो सर्वांना सांगू लागला. त्याचा आनंद पाहून तो ॲडमिट असलेल्या दवाखान्यातले लोकही आनंदी झाले.

हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया साइटवर  अमेरिकेच्या ओहायोमधील क्लिव्हलॅण्ड क्लिनिकने शेअर केला आहे. ६ वर्षांचा जॉन हेनरी नावाचा मुलगा.  तो सर्वांकडे जाऊन आनंदाची बातमी सांगतो आहे. जॉन हेनरी ६ महिन्यांपासून हार्ट ट्रांस्प्लांटची वाट पाहत होता.

डोक्यावर केस कमी टक्कल जास्त दिसतं? ५ रुपयांचा कढीपत्त्याचा असा वापरा भराभर वाढतील केस

जॉन हेनरीला हायपोस्टास्टीक लेफ्ट हार्ट सिंड्रोम नावाचा आजार जन्मत: आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे. ज्यात हृदयाचा एक भाग अविकसित राहतो आणि रक्ताचे पंपिंग व्यवस्थित होत नाही. त्याची ओपन हार्ट सर्जरी जन्माच्या ५ दिवसांनंतर झाली. आता रिकव्हर होण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: Viral 6 Year Old Boys Gets Donor For Heart Transplant Surgery Emotional Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.