वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठीच एक खास क्षण असतो. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्ही एक मुलगी तिचा वाढदिवस साजरा करताना पाहू शकता. ही मुलगी केकसमोर बसली आहे. (Viral Birthday Video) तिच्या शेजारी आणखी एक महिला उभी आहे. जी मेणबत्ती पेटवते. त्या बाईनं माचिसची काडी लावून मेणबत्ती पेटवताच मुलीच्या हृदयाची धडधड वाढते. वास्तविक, अचानक या कॅण्डलमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडतात आणि त्याच्या चेहऱ्यावर उडतात. (Viral video of birthday girl shocked surprised by the candle on her cake bursted on her face trending)
सुरूवातील कॅण्डल लावली तेव्ही ती खूपच घाबरली होती. पण मेणबत्ती विझताच मुलीने सुटकेचा नि:श्वास सोडला. हा व्हिडीओ तुम्हाला विनोदी वाटत असला तरी खरंच असे कोणाच्या बाबतीत घडले तर त्याच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल. याचा विचार करायला हवा. अशीच काहीशी प्रतिक्रिया या मुलीचीही होती जेव्हा तिने खुर्चीवर उडी मारली आणि मागे जाऊ लागली.
फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ
या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. चांगली गोष्ट म्हणजे मुलीला कोणत्याही प्रकारे दुखापत झाली नाही. वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याच्या वेळी दुर्घटना घडल्याचे अनेक व्हिडिओज समोर येतात. म्हणून या प्रकाराला हलक्यात न घेता सेलिब्रेशन करताना स्वत:ची काळजी घ्यायला हवी. मेणबत्तीमुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही, इजा पोहोचणार नाही याचा विचार करूनच सेलिब्रेशन करावं.