Join us  

Viral Comedy Video : गर्लफ्रेंडशी कॉलवर बोलताना एक एअरपॉड बायकोच्या कानातच राहीला; अन् मग.., पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 6:43 PM

Viral Comedy Video : 'कब आ रहे आप', असं त्या फोनवरील महिलेनं विचारल्यानंतर तो ,'हां जी सर' असं म्हणतो. त्यावर फोनवरील महिला 'समज गयी' असं म्हणते. मग नो प्रोब्लेम म्हणत तो फोन ठेवून देतो.

सोशल मीडियावर  रोज हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओज भावनिक असतात काही व्हिडिओ विचार करायला प्रवृत्त करतात तर काही व्हिडिओंचा उद्देश केवळ मनोरंजनाचा असतो. सोशल मीडियावर असाच एक नवर बायकोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral Comedy Video) या व्हिडिओतील विनोदी सीन पाहून तुम्हाला हसू आवरलं जाणार नाही.  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला आणि तिचा पती बेडवर बसलेले असतात. त्याचवेळी त्यांची मुलगी खेळत असते. (Comedy video of husband wife this video will make you laugh)

सुरूवातीला नवरा लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो मग त्याला एक फोन येतो. हा फोन एखाद्या स्त्रीचा असावा असं या महिलेच्या आवाजावरून कळतं. पण पत्नी बाजूला असल्यानं तो आपल्या वरिष्ठांशी बोलत असल्याचं भासवतो आणि त्याचप्रमाणे उत्तरं देतो. 'कब आ रहे आप', असं त्या फोनवरील महिलेनं विचारल्यानंतर तो ,'हां जी सर' असं म्हणतो. त्यावर फोनवरील महिला 'समज गयी' असं म्हणते. मग नो प्रोब्लेम म्हणत तो फोन ठेवून देतो.

मला ऑफिसमध्ये काम असल्यानं मी बाहेर जात असल्याचं पत्नीला सांगून तो  निघतो. लवकर येण्याचा प्रयत्न करेन असंही सांगतो. त्यानंतर त्याची पत्नी तिच्या कानात असलेला एअरपॉड घेऊन जाण्यास सांगते. आतापर्यंत या विनोदी व्हिडिओला १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. Wait for twist  असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. एका युजरनं 'गेम ओव्हर' अशी कमेंट या व्हिडिओवर केली आहे. तर कोणी 'बॅण्ड बज गई' असं म्हणत खिल्ली उडवली आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया