डान्स करायला अनेक जणांना खूप आवडतं.. पण चारचौघांसमोर डान्स करताना आपण जाड दिसू का, आपलं शरीर बेढब दिसेल का.. आपलं काय आता डान्स करण्याचं वय राहिलं आहे का.. असे अनेक प्रश्न ते स्वत:लाच विचारतात आणि मग मनातल्या मनात त्यांची डान्स करण्याची इच्छा दाबून टाकतात. अशा सगळ्यांनीच एकदा तरी सोशल मिडियावरच्या या डान्सिंग दादीचा (63 years old dadi dancing gracefully) व्हिडिओ पहायलाच हवा.. (viral video on instagram)
रवी बाला शर्मा असं या डान्सिंग दादीचं नाव. इन्स्टाग्रामवर त्या बऱ्यापैकी ॲक्टीव्ह असून त्यांनी त्यांचे सगळे डान्स व्हिडिओ ravi.bala.sharma या पेजवर शेअर केले आहेत. त्या आर्टिस्ट असून त्यांनी स्वत:ची ओळख त्याठिकाणी | Dancing Dadi | अशीच करून दिली आहे. या पेजवर त्यांनी शेअर केलेले डान्स व्हिडिओ एका पेक्षा एक सरस आहेत. डान्स करतानाचं त्यांचं हसणं, चेहऱ्यावरचा उत्साह आणि या ही वयात अगदी सहजतेने सुरू असणारं त्यांचं नृत्य या सगळ्याच गोष्टी अतिशय मोहक वाटत आहेत.
त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्या अल्लू अर्जूनच्या हलामिथी हबीबो (Halmithi Habibo या तामिळी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. डान्स करतानाचं त्यांचं ड्रेसिंगही अतिशय पाहण्यासारखं आहे. लाल टी शर्ट, काळी जीन्स आणि त्यावर लाल- काळा चेक्स असणारा शर्ट असं भन्नाट कॉम्बिनेशन त्यांनी केलं असून त्यांचा हा स्वॅग एकदा नक्कीच बघा.. मजा घेत घेत, स्वत:च्या आनंदासाठी नृत्य कसं करायचं, हे जाणून घ्यायचं असेल तर सोशल मिडियाच्या या डान्सिंग दादीचा डान्स बघायलाच हवा.