Join us  

"सपने मे मिलती है...", नवरा- नवरीने केला लग्नमंडपातच सत्या स्टाइल दणक्यात डान्स, व्हायरल व्हिडीओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 1:16 PM

Viral Video Of Couple Dance: लग्न असो किंवा कोणताही समारंभ, कपल डान्ससाठी हमखास वाजवलं जाणारं एक दणकेबाज गाणं म्हणजे "सपने मे मिलती है..." याच गाण्यावरचा बघा हा जबरदस्त डान्स.

ठळक मुद्देयावेळी दोघांमधे जे कोऑर्डिनेशन दिसून आले, खरेतर त्यामुळेच त्यांचे सादरीकरण अधिक खुलले. 

लग्न समारंभ म्हटलं की नाच- गाणं, मजा- मस्ती असं सगळंच आलं. त्यात आता तर थीमनुसार डान्स ठरवले जातात. या कार्यक्रमात नवरा आणि नवरी (dance performance by bride and groom) यांच्याकडच्या सगळ्याच मंडळींनी डान्स करणं अपेक्षित असतं. सगळ्यांचे डान्स झाले की मग सगळ्यात शेवटी नवरा- नवरीचा एक सगळ्यांपेक्षा वेगळा आणि खास परफॉर्मन्स होतो आणि त्यानंतर म्युझिकल प्रोगामचा शेवट होतो. अशाच एका लग्न समारंभातला हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त ट्रेण्डिंग (viral video) आहे. 

 

खरेतर हा व्हिडिओ तसा बराच जुना असून तो मार्च महिन्यातला आहे. उन्हाळ्यातली लग्नसराई संपली की तुळशीच्या लग्नानंतर आपल्याकडे पुन्हा एकदा लग्नसराई सुरू होते.

अभिनेत्री भाग्यश्री करतेय केटलबेल स्विंग, नेमका हा व्यायाम आहे कसा आणि काय त्याचे फायदे?

त्यानिमित्ताने होणाऱ्या संगीत- नृत्य कार्यक्रमासाठी वेगवेगळी बॉलीवूड गाणी, व्हिडिओ पाहिलेच जातात. त्यानिमित्ताने आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. यामध्ये नृत्य करणारे नवरा- नवरी दोघेही अतिउत्साही असून भरजरी लेहेंगा सांभाळत नवरीने केलेला हलकाफुलका डान्स तर त्या नवऱ्याचे दणकेबाज सादरीकरण वऱ्हाडी मंडळींची वाहवा मिळवून गेले.

 

यु- ट्यूबवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ नेटिझन्सला चांगलाच आवडत असून त्याला आतापर्यंत २० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

या व्हिडिओमध्ये गाणं सुरू झालं की नवरदेव आधी नाचायला सुरुवात करतो. पण नवरी मात्र तिच्या दागिन्यांशी काहीतरी करत असते. त्यानंतर मग मात्र ती ही नाचायला सुरुवात करते आणि नवरदेवाला खूप छान रिस्पॉन्स देते. अगदी त्याच्या तोडीस तोड डान्स करते. यावेळी दोघांमधे जे कोऑर्डिनेशन दिसून आले, खरेतर त्यामुळेच त्यांचे सादरीकरण अधिक खुलले. 

 

टॅग्स :सोशल व्हायरललग्ननृत्य