भारतीय स्वयंपाकात लसणाचा अधिक वापर होतो (Garlic). डाळीला फोडणी असो किंवा चटणी. लसणाची फोडणी देताच, पदार्थाची चव वाढते. पदार्थ चविष्ट करण्यासाठी, लसणाचा स्वाद आणि सुगंध दोन्हीची गरज भासते. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात विविध पौष्टीक घटक आढळतात. त्यात प्रोटीन, कार्ब्स, मॅगनीज, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर असतं. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यापासून ते हाडांसाठीही फायदेशीर ठरते.
लसूण खायला अनेकांना आवडते. पण त्याच्या पाकळ्या सोलण्यासाठी खूप वेळ जातो, आणि कंटाळाही येतो. जर आपल्याला लसूण सोलण्याचं वेळखाऊ काम झटपट करायचं असेल तर, २ ट्रिक्सचा वापर करून पाहा. लसूण सोलण्याचं किचकट काम होईल झटपट(Viral Easy Hack Gives You Ready-To-Use Garlic In A Minute).
लसूण सोला भरभर
गरम पॅनचा करा वापर
व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी
आपण पॅनवर लसूण भाजून, त्याची साल काढू शकता. यासाठी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या घालून भाजून घ्या. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. ४ ते ५ मिनिटांसाठी लसणाच्या पाकळ्या भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर हलक्या हाताने लसणाच्या पाकळ्या चोळा. या ट्रिकमुळे काही मिनिटात लसूण सोलून होतील.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर आपण स्वयंपाकात करतो. याच्या वापराने आपण लसूण देखील सोलू शकता. यासाठी एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. नंतर गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. नंतर त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. ५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर हलक्या हाताने लसणाच्या पाकळ्या चोळा. या ट्रिकमुळे काही मिनिटात लसूण सोलून होतील.