Lokmat Sakhi >Social Viral > भर उन्हात रस्त्यावर बसून आजीबाई विकत होत्या पेरू, पोलिसांनी पाहिलं आणि मग... बघा व्हायरल व्हिडिओ

भर उन्हात रस्त्यावर बसून आजीबाई विकत होत्या पेरू, पोलिसांनी पाहिलं आणि मग... बघा व्हायरल व्हिडिओ

Viral Emotional Video Of Old Women: रस्त्यावर बसून पेरू विकणाऱ्या या आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंडिंग आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 07:03 PM2022-12-06T19:03:01+5:302022-12-06T19:03:50+5:30

Viral Emotional Video Of Old Women: रस्त्यावर बसून पेरू विकणाऱ्या या आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंडिंग आहे. 

Viral Emotional Video: Poor old women selling guava on road, then police came and.... | भर उन्हात रस्त्यावर बसून आजीबाई विकत होत्या पेरू, पोलिसांनी पाहिलं आणि मग... बघा व्हायरल व्हिडिओ

भर उन्हात रस्त्यावर बसून आजीबाई विकत होत्या पेरू, पोलिसांनी पाहिलं आणि मग... बघा व्हायरल व्हिडिओ

Highlightsपोलिसांमधलं हे प्रेमळ हृदय आणि माणुसकी पाहून आजीबाईंनाही गहिवरून आलं. त्यांनी तोंडभरून आशिर्वाद देत पोलिसांचा निरोप घेतला. 

सगळी सोंगं आणता येतात. पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही, हे अगदी खरं. जवळ पैसा नसेल, तर तो मिळविण्यासाठी माणसाला त्याचं वय, आजारपणं, इतर काही अडचणी असं सगळं विसरावं लागतं आणि पैसा कमावण्यासाठी धडपड करावी लागते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या आजीबाईंची कथा काही यापेक्षा वेगळी नाही. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे, देहाकडे पाहिल्यावर त्यांनीही वयाची पंच्याहत्तरी हमखास गाठली असणार (Viral Emotional Video Of Old Women), असं वाटतं. पण तरीही भर उन्हात, निर्मनुष्य रस्त्यावर बसून पेरू विकण्याची (selling guava on road) वेळ त्यांच्यावर आली आहे.

 

या आजीबाई नेमक्या कोणत्या राज्यातल्या आहेत, याचा अंदाज येत नाही. पण व्हिडिओ मात्र चांगलाच गाजतोय.  Bundeli Bauchhar या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

डायबिटीस नियंत्रणात ठेवणारे ५ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात- आजार नियंत्रणात ठेवायचा तर.....

यात असं दिसत आहे की एक आजी बाई अगदी भर उन्हात एका झाडाखाली बसून पेरू विकत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा आहे. त्या ज्या रस्त्याच्या कडेला बसल्या आहेत, तो रस्ता अगदीच निर्जन आहे. रस्त्यावरून जाताना पोलिसांना त्या दिसल्या आणि म्हणून त्यांनी गाडी थांबवली. 

 

आजी विकत असलेल्या पेरूचा भाव विचारला. त्यावर आजींनी २० रुपये किलो असे उत्तर दिले. पोलीस म्हणाले तुमच्याकडचे सगळे पेरू किती किलो असतील, त्यावर त्या म्हणाल्या की दोन- अडीच किलो असतील.

भाऊ असावा तर असा! बहिणीला घासातला घास देणारा भाऊ, या मायेला काय म्हणावे? पाहा व्हिडिओ

ते ऐकून पोलिसांनी त्या आजींना १०० रुपयांची एक नोट दिली आणि त्यांना ताबडतोब घरी जायला सांगितले. एवढे पैसे दिलेस आता माझ्याकडचे पेरू तरी घे, असा प्रेमळ आग्रह आजींनी केला. पण पोलिसांनी मात्र साफ नकार दिला. पोलिसांमधलं हे प्रेमळ हृदय आणि माणुसकी पाहून आजीबाईंनाही गहिवरून आलं. त्यांनी तोंडभरून आशिर्वाद देत पोलिसांचा निरोप घेतला. 
 

Web Title: Viral Emotional Video: Poor old women selling guava on road, then police came and....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.