Join us  

झाडू में कॅलरी है! झाडूत कसले आले पोषण असं वाटत असेल तर ‘हे’ पाहा, झाडू कोण खातं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 3:08 PM

Social Viral: हा प्रश्न वाचून तुम्ही नक्कीच गोंधळात पडाल.. म्हणून सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा फोटो एकदा बघाच...(viral image of jhaadu or broom with a nutrition label)

ठळक मुद्देया झाडूवर जे पॅकिंग केलेलं होतं, त्यावर कॅलरी १५०, टोटल फॅट १० ग्रॅम, कोलेस्टरॉल शुन्य, सोडियम १६० एमजी अशी सगळी यादी लिहिलेली होती.

सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. एखादी गोष्ट लोकांनी उचलून धरली की मग ती जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जायला अवघ्या काही मिनिटांचा वेळ पुरेसा ठरतो. असाच एक मस्त मजेशीर फोटो सध्या सोशल मिडियावर खूप गाजतो आहे. आता आपल्याला माहिती आहे की कॅलरी, फॅट्स, प्रोटीन्स असे शब्द आहाराशी संबंधित असतात आणि ते कोणत्याही खाद्य पदार्थांच्या पाकिटावर लिहिलेले असतात. पण अशा पदार्थांची यादी लिहिलेला आणि त्यापैकी कोणता घटक किती प्रमाणात आहे हे सांगणारा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो एवढा व्हायरल होण्याचं कारण म्हणजे तो एका झाडूच्या पाकिटाचा आहे.(viral image of jhaadu or broom with a nutrition label)

Ye jhadu me bhi 150 calorie hote hai bhai 😖byu/Live-Bird8999 inindiameme

 

r/indiameme या सोशल मिडिया हॅण्डलवरून तो फोटो शेअर करण्यात आला आहे. कोणीतरी नवा कोरा झाडू दुकानातून विकत घेतला. आता नवा झाडू म्हटल्यावर तो व्यवस्थित पॅक केलेला असणार. या झाडूवर जे पॅकिंग केलेलं होतं, त्यावर कॅलरी १५०, टोटल फॅट १० ग्रॅम, कोलेस्टरॉल शुन्य, सोडियम १६० एमजी अशी सगळी यादी लिहिलेली होती.

रात्रीचं जेवण लवकर केलं तर मध्यरात्री भूक लागते? ५ पदार्थ खा- वजन वाढणार नाही 

हा फोटो सोशल मिडियावर एकच हशा पिकवत असून तो जबरदस्त व्हायरल झाला आहे. ज्याने ते पाहिलं आणि त्याचा फोटो घेतला त्याच्या निरिक्षण शक्तीचंही नेटिझन्स कौतूक करत आहेत. एवढंच नाही तर त्या फोटोंना आलेल्या कमेंटही खूपच वाचण्यासारख्या आणि अतिशय गमतीशीर आहे. एकाने म्हटलं आहे की आता मला समजलं की आपल्याकडे आई मुलांना झाडूने का मारते, तर काही जणांनी 'Jaadoo khane ko literally le liya inhone' असंही गमतीने म्हटलं आहे.

रोज प्या 'हे' जादुई पाणी! चेहऱ्यावर एवढा ग्लो येईल की फेशियल, ब्लीच करावंच लागणार नाही

वास्तविक पाहता प्लास्टिकच्या पुर्नवापराचा तो एक भाग आहे. यामध्ये काही कारणांनी रिजेक्ट झालेले प्लास्टिक किंवा रिसायकल केलेले जुने प्लास्टिक अशा गोष्टींच्या पॅकिंगसाठी वापरले जाते. त्यामुळेच एखाद्या अन्नपदार्थाच्या पाकिटाचे लेबल या झाडूला मिळाले आणि नेटिझन्ससाठी तो मोठाच चेष्टेचा, चर्चेचा विषय झाला. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया