Join us  

बॉयफ्रेंड पहिल्यांदाच बघत होता 'कल हो ना हो' आणि... गर्लफ्रेंडने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 2:41 PM

Viral Video Of an Emotional Boyfriend: एका बॉयफ्रेंडचा त्याच्या गर्लफ्रेंडने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

ठळक मुद्देत्याच्या गर्लफ्रेंडने नेमका तोच क्षण पकडला आणि तो कसा इमोशनल झाला याचा व्हिडिओ घेऊन तो सोशल मिडियावर शेअर केला.

सध्या व्हायरल असणाऱ्या या बॉयफ्रेंडच्या (boyfriend) बाबतीत जे झालं आहे, ते आपल्या बाबतीतही अनेकदा होतं आणि मग आपल्याला चांगलंच लाजल्यासारखं होतं. या तरुणाचंही तसंच झालं. शाहरुख खान- प्रिटी झिंटा- सैफ अली खान या त्रिकुटाचा 'कल हो ना हो' ('Kal ho naa ho') हा गाजलेला चित्रपट तो पाहात होता. नेमकं त्याच वेळी त्याच्या गर्लफ्रेंडने त्याचं शुटिंग घेतलं आणि मग चक्क सोशल मिडियावर तो व्हिडिओ व्हायरल (viral video) केला. बघा या व्हिडिओमध्ये नेमकी काय गंमत दडली आहे. 

 

nikiipatell या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून "He tried so hard too...", असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे. आजपर्यंत जवळपास सव्वातीन लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला.

कॅलरीज कमी होऊन झटपट होईल वेटलॉस, रुटीनमध्ये करा फक्त ५ सोपे बदल

या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा दिसतो आहे आणि तो पहिल्यांदाच 'कल हो ना हो' हा सुपरहिट चित्रपट बघतो आहे. हा चित्रपट जेवढा रोमॅंटिक आहे, तेवढाच तो इमोशनल देखील आहे. शाहरुख खानचा आजार लक्षात आल्यानंतर हळूहळू या चित्रपटातला इमोशनल सेन्स खूप वाढत जातो आणि बऱ्याचदा अनेक ठिकाणी बहुतांश लोकांना स्वत:च्या भावना कंट्रोल करणं कठीण होऊन जातं. 

 

तसंच काहीसं या तरुणाचंही झालं. पण सहसा चित्रपट बघताना प्रत्येकाचा हा प्रयत्न असतो की सीन बघताना आपण इमोशनल झालो आहे किंवा आपल्याला रडू येत आहे, हे कुणाला कळू नये.

ड्रेस- ब्लाउजच्या गळ्याच्या डिझाईननुसार करा कानातल्याची परफेक्ट निवड, ६ टिप्स- दिसाल सुंदर

त्यामुळे अनेक जणांचं अगदी हळूच, सगळ्यांच्या नकळत डोळे पुसणं सुरू असतं. असाच काहीसा या तरुणाचाही प्रयत्न होता. पण त्याच्या गर्लफ्रेंडने मात्र नेमका तोच क्षण पकडला आणि चित्रपट पाहताना तो कसा इमोशनल झाला आहे, कसा रडतो आहे, याचा व्हिडिओ घेऊन तो सोशल मिडियावर शेअर केला. अनेक जणांना त्या तरुणाचं अशा पद्धतीने सेंटी होणं मनापासून आवडलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामशाहरुख खानप्रीती झिंटासैफ अली खान