सोशल मिडियावर कधी कोणते व्हिडिओ व्हायरल (viral video) होतील काही सांगता येत नाही. काही व्हिडिओ खूपच मजेशीर असतात, तर काही खरोखरच विचार करायला लावणारे. त्यातल्या त्यात लहान मुलांचे व्हिडिओ तर अगदीच धमाल असतात. असाच एक मस्त मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. आई आणि मुलगा या दोघांचा तो व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये सगळ्यात मजेशीर आणि बघण्यासारखी गोष्ट आहे ती त्या लहानग्या मुलाच्या चेहऱ्यावरचे अवखळ भाव.(Mother was dancing and her son was taking her shooting)
maddibaby18andjchavezz_ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ४ दिवसांतच या व्हिडिओला ४ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. कधी कधी आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचे काही हावभाव किंवा आपण एखादी गोष्ट केल्यानंतर त्यावर मुलांकडून येणारी प्रतिक्रीया आपल्याला खूप आवडत असतात. त्यामुळे आपण वारंवार किंवा जाणूनबुजून अशा काही गोष्टी करतो, जेणेकरून आपल्याला मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघता येईल. असंच या आईनेही केलं. या व्हिडिओवरून असं दिसतं की तिचा डान्स तिच्या मुलाला खूप आवडत असावा आणि तो डान्स बघत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपणं त्याच्या आईला आनंद देत असावं.
व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की ती आई डान्स करते आहे आणि डान्स रेकॉर्ड करण्यासाठी तिने तिच्या चिमुकल्या मुलाच्या हातात मोबाईल दिला आहे. मुलाला वाटत आहे की तो आईचा डान्स रेकॉर्ड करतो आहे.
प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनासला झाला डायबिटीस, म्हणाला ४ लक्षणं जाणवल्यास व्हा सतर्क
पण आईने त्या कॅमेऱ्याचं सेटिंग अशा पद्धतीने केलं आहे की त्या मुलाच्या चेहऱ्यावरचेच हावभाव त्यात टिपले जात आहेत. तेच त्याचे हावभाव अतिशय निरागस आणि सुंदर असून त्यामुळेच हा व्हिडिओ एवढा व्हायरल होत आहे.