Lokmat Sakhi >Social Viral > आजोबांसोबत डान्स करायला आजींचा नकार, मग आजोबांनी पाहा काय केली युक्ती... व्हिडिओ व्हायरल 

आजोबांसोबत डान्स करायला आजींचा नकार, मग आजोबांनी पाहा काय केली युक्ती... व्हिडिओ व्हायरल 

Viral Funny Video: आजी- आजाेबांच्या एकमेकांवरील प्रेमाचा हा एक मस्त व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 06:00 PM2022-11-15T18:00:54+5:302022-11-15T18:02:52+5:30

Viral Funny Video: आजी- आजाेबांच्या एकमेकांवरील प्रेमाचा हा एक मस्त व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

Viral Funny Video of Old Age couple: Grandma's refusal to dance with grandpa, then see what trick grandpa did... video viral | आजोबांसोबत डान्स करायला आजींचा नकार, मग आजोबांनी पाहा काय केली युक्ती... व्हिडिओ व्हायरल 

आजोबांसोबत डान्स करायला आजींचा नकार, मग आजोबांनी पाहा काय केली युक्ती... व्हिडिओ व्हायरल 

Highlightsदोघांच्याही चेहऱ्यावरचे सुरेख भाव आणि खासकरून आजींचा पझेसिव्हनेस या दोन गोष्टींसाठी हा व्हिडिओ एकदा बघावाच.. 

प्रेम, जेलसी किंवा आपल्या पार्टनरबाबत खूप पझेसिव्ह असणं हे फक्त तरुण वयातच होतं असं नाही. वाढत्या वयासोबत (Viral Funny Video of Old Age couple) नवरा- बायकोमधलं प्रेम तर वाढत जातंच पण एकमेकांबाबतचा पझेसिव्हनेसही खूप वाढत जातो. या व्हायरल व्हिडिओमधले आजी- आजोबाही त्यापैकीच आहेत. आजोबांचा मिश्किलपणा आणि त्यांनी त्यांच्या बायकोला शिकवलेला प्रेमळ धडा नेटिझन्सला भारीच आवडला असून सध्या हा व्हिडिओ चांगलाच ट्रेण्डिंग आहे.

 

goodnews_movement या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. This gives me life!!! What a fun commute असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

सोनम कपूरच्या बाळाचं सुरेख बेडरूम, नातवासाठी आजीने करून घेतलं खास डिझाईन, फोटो व्हायरल

व्हिडिओ नेमका कुठला याचा अंदाज येत नाही. कारण तो एका रेल्वेमध्ये शूट केला असून त्यात काही परदेशी आणि काही भारतीय लोकही दिसत आहेत. प्रवासात सोबत असणारी काही तरुण मंडळी डान्स करत असल्याचं पाहून आजोबांनाही नाचण्याचा उत्साह येतो आणि ते स्वत:चा तोल सावरत हळू- हळू उठतात. आजोबांचं वय ७०- ७५ च्या आसपास असावं.

 

त्यानंतर ते त्यांच्या पत्नीला उठण्यासाठी हात देतात आणि तिला नृत्य करण्यासाठी बोलवतात. पण आजी त्यांना चक्क नकार देऊन टाकतात. हे पाहून आजोबा अजिबात हार मानत नाहीत आणि नाराज तर मुळीच होत नाहीत.

फक्त ४ पदार्थ आणि चवदार- खमंग पुलाव मसाला तयार, पाहा कुणाल कपूर यांची खास रेसिपी

ते त्यांच्या समोर उभ्या असणाऱ्या एका तरुण- सुंदर महिलेला डान्ससाठी आमंत्रित करतात. ती त्यांचा हात हातात घेते आणि दोघेही मस्त डान्स करू लागतात. हे पाहून इकडे आजी मात्र चांगल्याच चिडतात. त्या लगेच त्यांचा तोल सावरत उठतात आणि आजोबांसोबत डान्स करण्यासाठी तयार होतात. पण आता आजोबा त्यांना नकार देतात. मग तर आजी आणखीनच चिडतात आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या एका गृहस्थाला उठवून त्याच्यासोबत डान्स करतात. दोघांच्याही चेहऱ्यावरचे सुरेख भाव आणि खासकरून आजींचा पझेसिव्हनेस या दोन गोष्टींसाठी हा व्हिडिओ एकदा बघावाच.. 

 

Web Title: Viral Funny Video of Old Age couple: Grandma's refusal to dance with grandpa, then see what trick grandpa did... video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.