Join us  

सानिया मिर्झाने चेष्टा करत बहिणीला इतकं काय चिडवलं, की ती चिडून लालेलाल झाली? पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 5:20 PM

Viral Video of Mirza Sisters: दोघी बहिणींचा हा मजेदार व्हिडिओ बघून सानिया मिर्झाच्या (Sania Mirza) चाहत्यांना तर हसू आवरत नाहीये... तुम्ही बघितला का त्या दोघींचा हा ट्रेण्डिंग व्हिडिओ?

ठळक मुद्देसानिया तिच्या धाकट्या बहिणीची चांगलीच गंमत करते आहे, तर बहिण मात्र ताईने टाकलेल्या या गुगलीवर चांगलीच फुगून बसली आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झा सोशल मिडियावर (social viral) नेहमीच ॲक्टिव्ह असते. कधी तिच्या कुटूंबाचे तर कधी स्वत:च्या फिटनेसविषयीचे अनेक फोटो, व्हिडिओ ती सोशल मिडियावर नेहमीच शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. आता नुकताच तिने तिचा आणि तिच्या बहिणीचा एक मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सानिया तिच्या धाकट्या बहिणीची चांगलीच गंमत करते आहे, तर बहिण मात्र ताईने टाकलेल्या या गुगलीवर चांगलीच फुगून बसली आहे. दोघी बहिणींचा (Viral funny video of Sania Mirza and her sister) हा अवघ्या काही सेकंदांचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे.

 

दोघी बहिणींचा हा व्हिडिओ बघून आम्हालाही आमच्या भावंडांची आठवण येत आहे, अशी प्रतिक्रीया सानियाच्या अनेक चाहत्यांनी दिली आहे. कारण या व्हिडिओमध्ये सानिया तिच्या बहिणीबद्दल जे काही गमतीने बोललेली आहे, तेच वाक्य आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी चेष्टेने आपल्या पालकांकडून किंवा घरातल्या मोठ्या माणसांकडून ऐकलेलं आहे. किंवा आपणही कधी तरी आपल्या धाकट्या भावंडांना तेच वाक्य बोलून चिडवलेलं आहे. तेच वाक्य बोलून सानिया तिच्या बहिणीला म्हणजे अनाम मिर्झा हिला चिडवत आहे.

 

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये सानिया सुरुवातीला तिच्या चाहत्यांना हाय- हॅलो करते. त्यानंतर तिच्या धाकट्या बहिणीला जवळ बोलावून घेते. बहिण जवळ येताच सानिया तिची आपली धाकटी बहिण म्हणून ओळख करून देते. यानंतर मोठ्या प्रेमाने आपल्या बहिणीच्या कपाळावर चुंबन घेते. आणि नंतर म्हणते "ये मेरी बेहेना है, और इसको हमारे मम्मा- पापा कचरा कुंडीसे उठाये थे... ", हे वाक्य ऐकून तिची बहिण मात्र चांगलीच बुचकळ्यात पडली आणि नंतर सानियावर जाम चिडली. दोघी बहिणींचा हा धमाल व्हिडिओ एकदा बघायलाच हवा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसानिया मिर्झाइन्स्टाग्राम