लग्नसमारंभात जिथे नाच, गाणी, गोंगाट आणि मस्ती असते, तर दुसरीकडे मुलीच्या पाठवणीने थोडेसे भावनिक वातावरण निर्माण होते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये इतर लग्नांपेक्षा वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. (Viral groom emotional trending bride love marriage after long time cute moments of wedding ceremony)
या व्हिडिओमध्ये आपल्या लग्नात वधूला पाहून वर कसा भावूक होतो आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही हे दिसत आहे. काही लोक वराला गप्प बसवताना दिसतात. संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यापूर्वी, तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ देखील पाहा...
अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये वराच्या या अवस्थेवर वधूही हसते. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, खूप उपवास आणि प्रार्थनेनंतरवर आपल्या आयुष्यातील प्रेमाने लग्न करत आहे. वराच्या भावना पाहून तुम्हालाही त्याच्या प्रतिक्षेची कल्पना आली असेल.
क्षणिक सुखासाठी चालत्या कारमध्ये कपल नको ते करून बसलं; गाडीचा बॅलन्स बिघडला अन्...
या व्हिडिओने अनेक सोशल मीडिया यूजर्सच्या हृदयाला स्पर्श केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांचे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. आपल्या वधूला असे पाहून भावूक झालेला वर अनेकांना प्रभावित करत आहे