Join us  

'मला पिता व्हायचंय...', सुटी घेण्यासाठी सांगितलं काय कारण, मागितली चक्क २ महिन्यांची रजा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2022 5:15 PM

Funny Leave Application: हे कारण खरं असलं तरी सोशल मिडियावर मात्र या रजेच्या अर्जाने चांगलाच हशा पिकवला आहे... बघा नेमकं आहे तरी काय हे प्रकरण. (social viral)

ठळक मुद्देसध्या जो अर्ज सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, त्यात अर्जदाराने तब्बल ६० दिवसांची म्हणजेच २ महिन्यांची सुटी मागितली आहे.

नोकरी करणारी काही मंडळी एकदम बिंधास्त असतात. त्यामुळे त्यांना नोकरी करताना असं कधी खूप काही टेन्शन येत नाही किंवा ते कधी कामाचं, रजेचं किंवा ऑफिस संदर्भात इतर काही गोष्टींचं दडपण घेतानाही दिसत नाहीत. पण त्याउलट बरीच नोकरदार मंडळी अशीही असतात की त्यांना एका गोष्टीचं भलतंच टेन्शन येतं. ती गोष्ट म्हणजे त्यांना रजा हवी असते आणि त्यांच्या बॉसकडे ती कशी मागावी ते समजत नाही. त्यामुळे मग आदर्श वाटतील, अशी कारणं दिली जातात...(A Man request for 2 months leave to make baby)

 

या कारणांमध्ये सगळ्यात वरच्यास्थानी असणारं कारण म्हणजे 'तब्येत खराब आहे... बरं वाटत नाहीये....', दुसरं अशाच धाटणीचं कारण म्हणजे आई- वडीलांपैकी कुणाची किंवा मुलांची तब्येत बिघडली आहे.. अशी कारणं असतात. अशी कारणं दिली की रजा पटकन मिळते आणि शिवाय कुणी काही आक्षेपही घेत नाही. पण बांग्लादेशच्या एका महाशयांनी मात्र कमालच केली आहे. त्या व्यक्तीने जे काही कारण दिलंय ते सोशल मिडियावर चांगलच व्हायरल झालं असून अनेकांना ते वाचून हसूच आलं आहे.. मागेही अनेकदा बायको भांडून माहेरी गेली आहे, म्हणून रजा हवी आहे, असा एक रजेचा अर्ज व्हायरल झाला होता.. आता हा अर्जही थोडा तसाच आहे.

 

सध्या जो अर्ज सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, त्यात अर्जदाराने तब्बल ६० दिवसांची म्हणजेच २ महिन्यांची सुटी मागितली आहे. त्या अर्जावरून असं दिसत आहे की तो दुबई येथील कोणत्यातरी कंपनीमध्ये काम करत असून तो मुळचा बांग्लादेशचा आहे. त्याला सुटीत त्याच्या मायदेशी जायचं आहे. पण घरी जाण्याचं कारण त्याने जे काही दिलं आहे, ते खूपच मजेदार आहे. या अर्जात त्याने सुटीचं कारण 'Visit Family And Make Baby.' असं दिलं आहे. म्हणजेच घरी जाऊन त्याला कुटूंबाला भेटायचं आहे आणि पिता व्हायचं आहे. त्याचं हे उत्तर ऐकून काही जणं त्याची खिल्ली उडवत आहेत तर काही जणं मात्र त्याच्या खरे बोलण्याच्या धाडसाचं कौतूक करत आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया