आजकाल व्हायरल ऑप्टिकल इल्युजन प्रचलित आहे. लोक या मेंदूच्या व्यायामाचे कोडे देखील उत्कटतेने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर बरेच ऑप्लिकल इल्युजन्स व्हायरल होत आहेत. या ऑप्टिकल भ्रमांमुळे नेटिझन्सना चांगलंच डोकं लावावं लागत आहे. मग ते चित्र कोडे असो किंवा पेंटिंगमध्ये लपलेले काहीतरी असो, ऑप्टिकल भ्रम सोडवणे नेहमीच मजेदार असते. (Optical illusion can you find 2 cats hidden in this picture within 30 seconds)
आज असेच मजेदार एक कोडे घेऊन आलो आहोत. खोलीत बसलेल्या एका कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत कुटुंबासोबत लपलेल्या दोन मांजरीही आहेत. या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला 30 सेकंदात मांजर शोधायचे आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या सिरिजमधले हे आतापर्यंतचे सर्वात कठीण कोडे असल्याचे सिद्ध होताना दिसत आहे.
कारण केवळ एक टक्का लोकांनाच दिलेल्या वेळेत मांजरी शोधण्यात यश आले आहे. या फोटोत एक कुटुंब त्यांच्या खोलीत एकत्र आराम करत आहे. ज्यामध्ये एक माणूस खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत आहे, त्याची पत्नी त्याच्यासमोर बसली आहे आणि त्यांची मुलगी जमिनीवर बाहुलीशी खेळत आहे. त्यांच्या दिवाणखान्यात कुठेतरी दोन मांजरी लपल्या आहेत. ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत त्या दोघांना शोधण्याचे आव्हान अनेकांनी स्वीकारलं आहे.
इथे लपल्या आहेत २ मांजरी
अनेकांना ३० सेकंदापेक्षा जास्तवेळ शोधूनही मांजरी सापडलेल्या नाहीत. या फोटोत वर्तुळ केलेल्या जागी तुम्ही मांजरी पाहू शकता.