'पाणीपुरी' हे सगळ्यांचेच आवडते स्ट्रीट फूड आहे. पाणीपुरीच नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या जिभेवर त्याची चव रेंगाळून जाते. पाणीपुरी हा प्रकार जरी एकच असला तरीही त्याला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मुंबईत आपण 'पाणीपुरी' म्हणतो, दिल्ली मध्ये गोलगप्पे, गुजरातमध्ये 'पाणीपुडी' तर कोलकात्यामध्ये 'पुचका' या नावाने पाणीपुरी हा पदार्थ लोकप्रिय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चाट आवडतच. रगडा पुरी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ सगळ्यांना आवडतेच पण पाणीपुरी सगळ्यांना विशेष आवडते. रस्त्यावर, चौकात, नाक्यावर असणाऱ्या गाड्यांवर, मिळणारे हे चाट सगळ्यांचा जीव का प्राण आहेत. चाट मधला अतिशय लोकप्रिय आणि सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी(Pandal snack? 600 phuchkas used as decorations go missing in Kolkata).
लहान असो वा मोठं पाणीपुरी पाहिल्यावर तो खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. अशीच काहीशी घटना कोलकातामधील दुर्गापूजेच्या मंडपात घडून आल्याचे चित्र समोर येत आहे. कोलकातामधील बेहाला नूतन दल क्लबने (durgapuja 2023 panipuri inspired pandal in kolkata becomes headache for organisers as visitors try to munch on citys favourite snack)आयोजित केलेल्या दुर्गापूजेचा मंडप (Durgapooja in Kolkata) हा अनोखी थीम वापरुन सजवला होता. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या थीममध्ये केवळ सौंदर्यच नाही तर विशेष चव देखील होती. कोलकातामधील नवरात्रौउत्सवात दुर्गापूजेचा मंडप हा चक्क पाणीपुरीच्या पुऱ्यांनी सजवलेला पाहायला मिळत आहे. नेमकी काय आहे या पाणीपुरीची गोष्ट ते पाहूयात(Viral ‘panipuri’ inspired Kolkata puja pandal becomes a headache for organisers).
पाणीपुरीच्या पुऱ्यांनी सजवला दुर्गापूजेचा मंडप...
कोलकाता येथील शशिभूषण मुखर्जी रोड येथे दुर्गापूजेच्या वेळी बेहाला नूतन दलाच्या आयोजकांनी त्यांच्या मंडळाच्या सजावटीसाठी पाणीपुरीच्या पुऱ्यांचा वापर केला होता. पाणीपुरीच्या पुऱ्यांचा बनवलेला हा देखावा तयार झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र हे पूजा मंडप उघडताच त्यावर सजावटीसाठी म्हणून ठेवलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या हळूहळू गायब होऊ लागल्या. सजावट केलेल्या या मंडपातून ६०० पाणीपुरीच्या पुऱ्या गायब झाल्या असल्याची माहिती बेहाला नूतन दलाच्या आयोजकांनी दिली.
फळं - भाज्या चिरताना चॉपिंग बोर्ड सटकतो ? ४ सोप्या टिप्स, बोर्ड राहील एकाच जागी स्थिर...
लोकांनी या पाणीपुरी चक्क खाल्ल्या पण...
संयोजक संदीप बॅनर्जी म्हणाले की दक्षिण कोलकाता पूजा समितीला याची जाणीव होती की काही भक्तांना हे पुचका पाहून ते खाण्याचा मोह आवरता येणार नाही. या पाणीपुरी पाहून कित्येक लोकांना ते आकर्षक वाटून खाण्याचा मोह होणार हे सहाजिकच आहे. त्यामुळे कोणीही त्यांना बाहेर काढून खाण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना देखील करण्यात आली होती. या पाणीपुरीच्या पुऱ्या खराब होऊ नयेत तसेच उत्सव संपेपर्यंत त्या आहेत तशाच कुरकुरीत रहाव्यात यासाठी या पुऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स व रसायने यांची फवारणी करण्यात आली होती. या पुऱ्या उत्सवा दरम्यान कुरकुरीत राहाव्यात म्हणून त्यांना बाहेरून चिकट गोंद व एक केमिकल्सयुक्त हार्डनर लावण्यात आले होते. परंतु अशी केमिकल्सची फवारणी केलेली पाणीपुरी खाल्ल्याने लोकांचे आरोग्य बिघडू शकते अशी माहिती आयोजकांनी दिली.
स्वरा भास्करला असे का वाटते की, आपण सगळेच कधीच आईचे पुरेसे आभार मानत नाही ?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक पाणीपुरी खाताना दिसले...
या मंडळाचे आयोजक म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज पाहून आम्ही घाबरलो. या फुटेजमध्ये एक पाहुणा मंडळाच्या आतील केलेल्या सजावटीमधून पाणीपुरी काढून खात होता. इतर अनेक लोक देखील सजावटीसाठी ठेवलेली ही पाणीपुरी गुपचूप काढून खात होते. प्रत्येकाने ही पाणीपुरी खाल्ली नसावी अशी आशा आम्ही करतो, असे आयोजक म्हणाले. उत्तर कोलकातामधील डमडम येथील रहिवासी संचारी दास यांनी सांगितले की, त्यांनी सप्तमीच्या दिवशी या मंडळाला भेट दिली होती. तेव्हा एवढ्या साऱ्या पाणीपुऱ्यांच्या पुऱ्या एकाच वेळी बघून ते खाण्याची इच्छा देखील झाली होती, अशी कबुली त्यांनी दिली. इतक्या पुऱ्या पाहून ते खाण्याची भुरळ पडताच तिथे उपस्थित असणाऱ्या स्वयंसेवकांनी आम्हाला त्या सजावटीपासून दूर केले, असा अनुभव त्यांनी सांगितला.
तब्बल ८३ लाख पगार देतो पण मुले सांभाळायला मदतनीस हवी, अमेरिकन राजकीय नेत्यासमोर मोठा प्रश्न...
मूर्तींला अर्पण केलेल्या पाणीपुरीही काहींनी काढून घेतल्या...
समितीच्या एका सदस्याने सांगितले. काहीजणांनी मूर्तींना प्रतिकात्मकपणे अर्पण केलेल्या पाणीपुरीही काढून नेल्या. शालीच्या पानांनी सजवलेल्या या पाणीपुऱ्या मंडळाच्या छतापासून वेगवगेळ्या १५ थरांमध्ये टांगण्यात आल्या होत्या. पेटीत ठेवलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तर सगळ्यांनी हात घालून बाहेर काढल्या. या पाणीपुरीच्या पुऱ्या एवढे कुतूहल आणि मोह निर्माण करू शकेल याचा अंदाज आम्हाला आला नव्हता.