विमान प्रवास हा अतिशय सुरक्षित, सोफिस्टिकेटेड असा आपण समजतो. पण काही वेळेस काही जणांना आलेले असे काही विचित्र अनुभव आपण ऐकतो की खरोखरच हा प्रवास सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न मनात निर्माण होतो. प्रवाशांचे सामान हरवणे किंवा अपेक्षित ठिकाणी सामान न पोहोचणे असे अनुभव विमान असो बस असो किंवा रेल्वे असो.. असे कोणत्याही प्रवासात येऊ शकतात. ते एकवेळ समजून घेण्यासारखेही आहे. पण इथे या व्हायरल फोटोंमध्ये त्या बॅगची जी काही अवस्था झाली आहे, ते पाहून तर अनेकांचं डोकंच चक्रावून गेलं आहे.
Reddit या सोशल मिडियाच्या @an0nym0ose या युजरद्वारे एका बॅगचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. My uncle's suitcase after his flight... असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.
स्ट्रेच मार्क आहेत तर आहेत, एक जीव जन्माला घातलाय.. उर्वशी ढोलकिया म्हणते, त्यात लपवण्यासारखं काय?
हा प्रवासी नेमका कोण आणि त्याने कुठून कुठे प्रवास केला याबाबतचा काहीही उल्लेख या पोस्टमध्ये नाही. पण बॅगची जी काही अवस्था झाली आहे, ती मात्र खरोखरच अतिशय वाईट असून या पोस्टला अवघ्या २- ३ दिवसांतच 97.9k लोकांनी प्रतिसाद दिला आहे.
यामध्ये जी बॅग दिसते आहे तिचा पुढचा भाग आणि एक बाजू पुर्णपणे खराब झाली असून ती बॅग प्रवासादरम्यान कुठे घासली गेली आहे की जळाली आहे, हे कळत नाही.
थंडीमुळे चेहरा काळवंडला? वापरा ३ डी-टॅन फेसपॅक, हिवाळ्यातही चेहरा दिसेल सुंदर- चमकदार
काही जणांना असेही वाटते आहे की एखादं टोकदार हत्यार किंवा वस्तू घेऊन त्या बॅगची अशी अवस्था केली असावी. ही बॅग हवेत उंच उडणाऱ्या विमानातून थेट जमिनीवर तर आपटली नाही ना, असाही गमतीदार प्रश्न एका प्रवाशाने विचारला आहे. एकंदरीतच बॅगची अशी विचित्र अवस्था पाहून नेहमीच विमान प्रवास करणारे नेटिझन्स चांगलेच वैतागले आहेत.