मौनी रॉय आणि सुरज नांबियार (Mouni Roy and Suraj Nambiar) यांचा विवाह याच वर्षी जानेवारी महिन्यात पार पडला. त्यामुळे मौनी रॉयची ही पहिलीच करवा चौथ (Karwa chauth) होती. पहिल्या वहिल्या सणाचा उत्साह वेगळाच असल्याने मौनीने त्यासाठी अगदी जय्यत तयारी केली होती. मेकअप, ज्वेलरी, ड्रेसिंग या सगळ्यांवर तर तिचे लक्ष होतेच, पण मेहंदीच्या डिझाईनबाबतही ती एकदमच चोखंदळ राहिली. कारण तिने निवडलेले डिझाईन खरोखरच खूप वेगळे आणि खास होते. म्हणूनच तर पहिल्या करवा चौथनिमित्त तिच्या हातावर रेखाटलेल्या मेहंदीचे डिझाईन्स (unique mehendi design ideas) जबरदस्त व्हायरल झाले होते.
मेहंदी डिझाईन्सचे काही फोटो मौनीने इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याला "Firsts are always special…♥️ Happy Karwa Chauth beauties",अशी कॅप्शन दिली आहे. त्यातूनच तिचा या पहिल्या- वहिल्या सणाचा उत्साह दिसून येतो.
३ बर्नरची शेगडी घ्यावी की ४? ग्लास टॉप घ्यावी की स्टिलच बरे? कशी निवडाल परफेक्ट गॅस शेगडी?
दोन्ही हातांवर तिने अगदी कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढली आहे. मेहंदी कोणी काढली, त्या कलाकाराचे नाव मात्र तिच्या पोस्टमधे नाही. तिच्या उजव्या हातावर शिव- पार्वती यांचे सुंदर रेखाटन असून डाव्या हातावर करवा चौथनिमित्त हातात चाळणी घेऊन चंद्र बघणाऱ्या एका सुंदर स्त्री चे रेखाटन केलेले आहे.
नेहमीचे पानं- फुलं किंवा इतर टिपिकल मेहंदी डिझाईन्सपेक्षा हे डिझाईन अतिशय वेगळे आणि करवा चौथच्या थीमला अनुसरून होते. त्यामुळेच त्याची एवढी चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला असतोच, पण त्यासोबत वापरा हे २ पदार्थ आणि कमाल बघा
आता मौनीची ही स्टाईल पाहून पुढच्यावर्षी करवा चौथला अशाच पद्धतीच्या मेहंदी डिझाईनची फॅशन येईल, अशी मजेशीर चर्चाही यानिमित्ताने सोशल मिडियावर होत आहे.