Join us  

चहाप्रेमी असाल तर 'हे' बघाच, चक्क फळं टाकून केला चहा- पाहा फळांच्या चहाची व्हायरल रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2024 9:14 AM

Weird Food Combination: या रेसिपीमध्ये चहाच्या नावाखाली हा जो काही गोंधळ घातला आहे, ते पाहून अनेक चहाप्रेमी संतापले आहेत. (Viral recipe of fruit chai)

ठळक मुद्देतुम्ही चहाप्रेमी असाल आणि अशा भलत्याच चहाची चव चाखून पाहण्याची इच्छा झाली तर घरी ही रेसिपी ट्राय करून पाहा.

चहा... आहाहा... हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांचे कान टवकारले जातात. खासकरुन सकाळच्या वेळी आणि दुपारी ४- ५ च्या सुमारास तर बहुतांश लोकांना चहा पाहिजेच असतो. तो जर मिळाला नाही, तर पुढचं काम सुचत नाही. आलं, वेलची, दालचिनी किंवा गवतीचहा असं घालून केलेला गरमागरम चहा समोर आला आणि तो छान भुरके मारत घेतला की मग अंगात कशी तरतरी येते... पण सोशल मिडियावर मात्र चहाचा जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे (have you ever tried fruit tea?), तो पाहून मात्र अनेकांना फक्त घेरी यायची बाकी राहिली आहे. (Viral recipe of fruit chai)

 

फळांचा चहा असं नाव या रेसिपीला देण्यात आलं असून deliciouscapital या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये चहाची जी रेसिपी दाखवली आहे ती आता बघूया..

चोरट्याने चोरलेला फोन पावभाजीने मिळूवन दिला- बघा कशी झाली गंमत- वाचा व्हायरल पोस्ट

सगळ्यात आधी तर आपण चहा करायला नेहमीप्रमाणे जसं पाणी उकळायला ठेवतो, तसं ठेवलं. त्यानंतर त्या चहामध्ये चहा पावडर, साखर आणि किसलेलं आलं घातलं. यानंतर बारीक चिरलेले सफरचंद, केळी आणि द्राक्षंही त्या चहामध्ये टाकले. फळं टाकल्यानंतर ते सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं आणि त्याला चांगली उकळी येऊ दिली.

 

उकळी आल्यानंतर दूध टाकून पुन्हा सगळं मिश्रण हलवून घेतलं. यानंतर पुन्हा एक उकळी येऊ दिली आणि नंतर हा चहा गाळून कपामध्ये ओतला.

पार्टनरसोबत बेड शेअर करावा की एकटंच झोपावं- मानसिक आरोग्यासाठी काय जास्त चांगलं? अभ्यास सांगतो....

आता हा असा फळं घातलेला चहाही असू शकतो, हे ऐकून आणि बघूनच अनेकांना तो अगदी नको- नको वाटतो आहे. तुम्ही चहाप्रेमी असाल आणि अशा भलत्याच चहाची चव चाखून पाहण्याची इच्छा झाली तर घरी ही रेसिपी ट्राय करून पाहा. किंवा मग थेट सुरत गाठूनच हा चहा प्या. कारण हा चहा सुरतमध्ये मिळतो, असं त्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

टॅग्स :अन्नव्हायरल फोटोज्सोशल व्हायरलपाककृती