Join us  

डोसा करायच्या नावाखाली भलताच गोंधळ, बघा व्हायरल रेसिपी आणि सांगा 'त्या' पदार्थाला म्हणायचं काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 3:34 PM

Viral Recipe Of Pav Bhaji Dosa: सध्या व्हायरल होणारी ही रेसिपी बघा आणि आता तुम्हीच सांगा की या पदार्थाला नेमकं कोणतं नाव द्यायचं... (weird food combination of masala dosa and pav bhaji)

ठळक मुद्देजो पदार्थ तयार होताना तुम्हाला दिसेल त्याला आता डोसा म्हणावं, पावभाजी डोसा म्हणावं की आणखी काही म्हणावं हे तुम्हीच ठरवा.

साधा डोसा, चीज डोसा, पनीर डाेसा किंवा मसाला डोसा हे डोसा प्रकार बहुसंख्य भारतीयांच्या आवडीचे. दक्षिण भारतीय लोकांच्या जेवणातला तर तो अगदी रोजचा पदार्थ. डोस्याचे बाकीचे सगळे प्रकार आपण स्विकारले आपल्याला ते आवडलेही (Viral recipe of pav bhaji dosa). पण सध्या डोसा किंवा मसाला डोसा ही रेसिपी करण्याच्या नावाखाली एका शेफने जो काही गोंधळ घातला आहे, तो पाहून अनेक डोसाप्रेमी कमालीचे नाराज झाले असून बरेच दक्षिण भारतीय लोक तर आमच्या इडली- डोश्यासोबत असा खेळ करणं थांबवा रे असंही म्हणत आहेत.(weird food combination of masala dosa and pav bhaji)

 

foodiekru या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जो पदार्थ तयार होताना तुम्हाला दिसेल त्याला आता डोसा म्हणावं, पावभाजी डोसा म्हणावं की आणखी काही म्हणावं हे तुम्हीच ठरवा.

सकाळी व्यायामाला वेळच मिळत नाही? रात्री व्यायाम करा- मिळतील दुप्पट फायदे, वजनही उतरेल 

सगळ्यात आधी तर शेफने तव्यावर डोश्याचं पीठ टाकलं आणि ते पसरवून घेतलं. त्यानंतर त्याने त्यावर वेगवेगळ्या चिरलेल्या भाज्या आणि भरपूर चीज ओतलं. आता इथपर्यंत तर सगळं ठिक होतं. पण त्यानंतर त्याने जे काही केलं ते पाहून तर अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण त्या शेफने चक्क त्या डोसावर, त्याच्यावरच्या भाज्यांवर अर्धी वाटली पाणी ओतलं आणि सगळ्या भाज्या एकत्र करून कालवल्या.

 

यानंतर पुन्हा डोशावरची एकजीव झालेली सगळी भाजी काढून एका ताटलीत भरली. नंतर तो डोसा छान घडी घालून आणि त्याच्यासोबत ताटलीतली भाजी देऊन तो ग्राहकांना सर्व्ह केला.

टरबूजाचा ज्यूस नेहमीचाच, आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा- लगेच रेसिपी बघा

आता या पदार्थाला काय नाव द्यायचं ते तुम्हीच बघा. "Dear north indians... Please dont destroy our food items for ur profit..its a kind request", "Uncle apki pav bhaji me thoda sa dosa gir gya" अशा आशयाच्या अनेक कमेंट या व्हिडिओला मिळाल्या आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती