Join us

अरे आवरा! लाल साडी अन् स्पोर्ट्स शूज घालून महिलेचा खतरनाक स्टंट; पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 17:18 IST

Viral Saree Stuns Internet Watch : मिशा नावाच्या ऑफिशियल अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मिशा एक एक एथलिट आहे. 

डान्स, गाण्याचे व्हिडिओ व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात. त्यात काही दृश्य अशीही असतात जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तुम्ही आतापर्यंत अनेक स्टंटमॅन पाहिले असतील सोशल मीडियावर आत्ता स्टंट करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral Video desi women breathtaking somersault in red hot saree stuns internet watch) मिशा नावाच्या ऑफिशियल अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मिशा एक एक एथलिट आहे. 

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण साडी नेसून या महिलेनं जबरदस्त स्टंट केला आहे. ऐरवी साडी नेसल्यानंतर मुलींना चालायलाही जमत नाही. अशात हा स्टंट पाहून लोक अवाक् झाले आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ महिला लाल रंगाची साडी आणि स्पोर्ट शूज घालून स्टंट करताना दिसून येत आहे.

रस्त्यावर फळं विकता विकता मुलांचा अभ्यास घेणारी 'माऊली'; व्हिडिओ व्हायरल, अशी जिद्द पाहिजे..

इंस्टाग्राम युजर मिशा शर्मा यांच्याकडून शेअर करण्यात करण्यात आला आहे.  या व्हिडिओत महिलेचा फिटनेस,  फ्लेसिबिलिटी आणि स्टेप्स पाहून सगळेचजण अवाक् झाले आहेत. या व्हिडिओवर युजर्सनी  कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत. यात तिने कोलांटी उडी मारलेली दिसून येत आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया