सुट्टीसाठी कारणं शोधणं हे आपण शाळेत असल्यापासून पाहत आलो आहोत. लहान असताना शाळेत नंतर कॉलेजमध्ये अखेरीस नोकरीवरही आपल्याला सुट्टीसाठी काही ना काही कारणं सांगावी लागतात. कारण योग्य कारण सांगितल्याशिवाय सुट्टी मंजूर होत नाही. ( (Boss seen employee dance video) असंच काहीसं स्पेनच्या तरूणीसोबत घडलं. ऑफिसमध्ये खोटं कारण सांगून घेतलेली सुट्टी तिच्या चांगलीच अंगाशी आले. कंबर दुखतेय असं सांगून या मुलीनं सुट्टी घेतली आणि बोल्ड डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ तिच्या बॉसच्या पाहण्यात आला. त्यानंतर ते घडलं ते खूपच अनपेक्षित होतं. (Viral spanish woman took leave from office for back pain seen twerking in video gets fired)
ऑडिटी सेंट्रेल न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनवसार स्पेनच्या सुपीरिअर ट्रिब्यूनल ऑफ जस्टिस म्हणजे कोर्टानं सुपरमार्केट कंपनीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. याअंतर्गत एका महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. या महिलेचं नाव मिसेस पायडॅड असल्याचं समोर आलंय. २००६ पासून ती सेमार्क एसी ग्रुप नावाच्या कंपनीत काम करत होती.
मागच्यावर्षी जानेवारी महिल्यात ती पेड लिव्हवर गेली. या सुट्टीचं कारण तिनं कंबरदुखी सांगितलं होतं. कंबरेत भयंकर वेदना होत असल्यानं ऑफिसला यायला जमणार नाही असं तिनं बॉसला सांगितलं. पण हे खोटं कारण असल्याचं सिद्ध झालं. सुट्टी घेतल्यानंतर तिनं आपल्या टिकटॉक अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात ती बोल्ड डान्स करताना दिसली. हा व्हिडिओ ऑफिसमधल्या लोकांनी पाहिल्यानंतर तिला मेल पाठवून तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आलं.
मेलमध्ये असे लिहिले होते की कंपनीच्या एरिया मॅनेजरने तिचा टिकटॉक व्हिडिओ पाहिला आहे ज्यामध्ये ती डान्स स्टेप्स करत आहे जे तिच्या आरोग्याच्या स्थितीनुसार करणे अशक्य आहे. या महिलेने गेल्या वर्षीच तिच्या कंपनीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता, मात्र आतापर्यंत झालेल्या सर्व सुनावणीत ती हरत असल्याचे दिसत आहे. न्यायाधीशांनी सांगितले की, ज्या साडेआठ महिन्यांसाठी ती महिला रजेवर होती, त्या काळात तिने सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते.