Lokmat Sakhi >Social Viral > झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या महिलेची व्हायरल गोष्ट, ती असं करते कारण.. 

झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या महिलेची व्हायरल गोष्ट, ती असं करते कारण.. 

Viral Story Of a Woman Who Shops In Sleep: झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या एका महिलेचा किस्सा सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2024 02:51 PM2024-06-08T14:51:24+5:302024-06-08T15:52:53+5:30

Viral Story Of a Woman Who Shops In Sleep: झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या एका महिलेचा किस्सा सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

viral story of a Woman in london shops in sleep and spend rs 3 lakh | झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या महिलेची व्हायरल गोष्ट, ती असं करते कारण.. 

झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या महिलेची व्हायरल गोष्ट, ती असं करते कारण.. 

Highlightsइंग्लंडमध्ये राहणाऱ्या केली नाईप्स या महिलेची गोष्टच वेगळी. ती चक्क झोपेत खरेदी करते आणि ती ही कित्येक लाख रुपयांची...

शॉपिंग करणं हा प्रत्येक वयाेगटातल्या महिलेचा आवडीचा विषय. काही अपवाद सोडले तर प्रत्येकीला शॉपिंग करायला आवडतं. आपल्या खिशाकडे पाहून त्यातल्या त्यात बजेटमध्ये शॉपिंग करणं हे बऱ्याच जणींचं वैशिष्ट्य. इथे जागेपणी सुद्धा आपण एकेक वस्तूची किंमत नीट पारखून घेतो. भरपूर घासाघीस करतो आणि आपल्याला पटलं तरच व्यवहार करतो. काही जणी तर दुकानदाराशी व्यवहार करण्यात इतक्या पटाईत असतात की अगदी स्वप्नातही त्या किमतीबद्दल घासाघीस करू शकतील. पण इंग्लंडमध्ये राहणाऱ्या केली नाईप्स या महिलेची गोष्टच वेगळी. ती चक्क झोपेत खरेदी करते आणि ती ही कित्येक लाख रुपयांची...(viral story of a Woman in london shops in sleep and spend rs 3 lakh)

 

सध्या या केली नाईप्सची गोष्ट साेशल मिडियावर व्हायरल होत आहे. न्युयॉर्क टाईम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार केली ४२ वर्षांची असून तिला शॉपिंगचा भयंकर नाद आहे. त्यातच तिला पॅरासोमनिया हा एक प्रकारचा स्लीप डिसऑर्डर झाला असून त्यामुळे ती झोपेत शॉपिंग करते.

अक्षयकुमारला खूप आवडतो 'हा' सुपरहेल्दी पदार्थ, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम, बघा रेसिपी

आजवर तिने अशी बऱ्याचदा खरेदी केली असून त्या आजारापायी तिचे लाखोंचे नुकसान झाले आहे. झोपेत केली मोबाईलवरुन फास्ट डिलेव्हरी देणाऱ्या शॉपिंग साईटवर जाते. तिथे तिला वाटेल त्या गोष्टी ऑर्डर करते आणि क्रेडिट कार्डवरून त्याचे पेमेंटदेखील करून टाकते.

 

या सगळ्या वस्तू सकाळी जेव्हा घरी येतात तेव्हा त्या पाहून तिची झोप उडते. यातल्या बऱ्याच वस्तू ती पुन्हा रिटर्न करते. पण बहुतांश वस्तूंवर रिटर्न पॉलिसी नसल्याने तिला त्या नाईलाजाने ठेवून घ्याव्या लागतात.

आलिया भटने नववीत असताना पहिल्यांदा नेसली साडी आणि झाली 'अशी' फजिती.... व्हिडिओ व्हायरल

आपण आज झोपल्यानंतर किती रुपये खर्च करू याची भीतीही तिला आता प्रत्येकवेळी वाटू लागली आहे. यामुळे तिच्यावर कित्येक रुपयांची उधारीही झाली आहे. केली बिचारी स्वत:च या आजारामुळे आणि त्यापायी होणाऱ्या खरेदीच्या खर्चामुळे वैतागली आहे. 
 

Web Title: viral story of a Woman in london shops in sleep and spend rs 3 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.