हल्ली आपण बघतो आहोत की कुटूंबातले प्रत्येक जण मोबाईलमध्येच अडकून बसलेले आहेत. कामामुळे आता मोबाईल ही प्रत्येकाची गरज झाली आहे. पण त्याचा मात्र लहान- थोर अशा सगळ्यांकडूनच अतिरेक होतो आहे, हे देखील तितकंच खरं आहे. कोणत्याही कुटूंबात सुटीच्या दिवशी कुटुंबीय एकमेकांशी बोलत नसतात तर मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात... थोड्या- फार फरकाने प्रत्येक घरात हेच चित्र दिसून येतं. मंजु गुप्ता नामक महिलेच्या घरातही असंच चित्र होतं. म्हणूनच कुटूंबियांचं मोबाईलचं व्यसन सोडविण्यासाठी तिने एक ठोस पाऊल उचललं आणि चक्क कुटुंबियांशी एक करार केला.. त्याचीच तर गोष्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. (Viral story of a woman who makes her family sign an agreement to reduce their phone usage)
मंजू गुप्ता यांनी ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कुटूंबियांशी एक करार केला आहे. त्या स्टॅम्प पेपरचे फोटो त्यांच्या भाचीने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या अटींचे उल्लंघन केले, तर कुटूंबियांना कडक शिक्षाही ठोठावण्यात येणार आहेत.
१ सोपा उपाय- कुकरचं गॅस्केट वर्षानुवर्षे टिकेल, खरकटं पाणी बाहेर येऊन झाकण खराबही होणार नाही
या करारातला पहिला नियम असा आहे की सगळ्यांनी झोपेतून उठल्यावर आधी मोबाईल पाहायचा नाही तर थेट जाऊन सुर्यदर्शन करायचे. दुसरा नियम असं सांगतो की सगळे जण रात्री जेवायला एकत्र डायनिंग टेबलवर बसणार आणि त्यावेळी फोन त्यांच्या जवळ नसणार.
ग्रीन चिली सॉस विकत आणण्यापेक्षा घरीच तयार करा- ही घ्या कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी
तिसऱ्या नियमानुसार कोणीही वॉशरुमला जाताना त्यांचा फोन सोबत घेऊन जाणार नाही. करारातले हे नियम कुणी मोडले तर शिक्षा म्हणून त्या सदस्याचा झोमॅटो, स्विगीचा ॲक्सेस बंद केला जाणार आहे... बघा आहे की नाही भन्नाट आयडिया... तुमच्याही कुटूंबाला लागलेलं मोबाईलचं व्यसन सोडवायचं असेल तर ही एक चांगली आयडिया आहे.