Join us

जगातली सगळ्यात 'जेलस वुमन', संशयी तर इतकी की नवऱ्याला रोज घरी आल्यावर द्यावी लागते ‘ही’ परीक्षा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2024 18:03 IST

Viral Story Of Most Jealous Woman: बघा पदोपदी नवऱ्याला परीक्षा द्यायला लावणारी ही महिला नेमकी कोण

ठळक मुद्देती स्टीव्हवर वारंवार संशय घेते. तिला कायम असं वाटत असतं की स्टीव्ह तिच्याशी खोटं बोलतो आहे, तिला फसवतो आहे.

प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याबद्दल पझेसिव्ह असते. आपली बायको आपल्याबद्दल थोडीफार पझेसिव्ह असणं हे नवऱ्याला देखील आवडतं. कारण त्यामध्ये तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम दिसून येत असतं. पण हा पझेसिव्हनेस वाढत गेला तर ते मात्र त्रासदायक होतं. नवऱ्याने किंवा बायकोने आपल्यावर वेळोवेळी संशय घ्यावा, हे कोणालाच आवडणारं नाही. असं जर आपला पार्टनर करत असेल तर जाम वैताग येतो. राग येतो. पण स्टीव्ह वूड (Steve Wood) या नावाच्या व्यक्तीला मात्र ते सगळं वारंवार अतिशय शांतपणे, कोणताही राग चेहऱ्यावर दिसू न देता सहन करावं लागतं. कारण त्याची बायको डेब्बी वूड (Debbi Wood) ही जगातली सर्वाधिक मत्सरी स्त्री म्हणून ओळखली जाते. (viral story of most jealous woman)

 

स्टीव्ह आणि डेब्बी या जोडप्याची स्टोरी unilad and ladbible या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली असून डेब्बी ही जगातली सर्वाधिक मत्सरी स्त्री म्हणून ओळखली जाते. ती स्टीव्हवर वारंवार संशय घेते.

बेडरुममध्ये ठेवा कोरफड, शांत झोप येण्यासह मिळेल भरपूर ऑक्सिजन, ४ फायदे-घरात वाटेल फ्रेश

तिला कायम असं वाटत असतं की स्टीव्ह तिच्याशी खोटं बोलतो आहे, तिला फसवतो आहे. त्यामुळे मनातली ही भीती, शंका दूर करण्यासाठी तो जेव्हा केव्हा बाहेरून घरात येतो तेव्हा त्याला प्रत्येकवेळी लाय डिटेक्टर टेस्ट द्यावी लागते आणि स्वत:चा खरेपणा डेब्बीला सिद्ध करून दाखवावा लागतो. 

 

एवढ्यावरच ती थांबलेली नाही. तर दिवसातून कित्येक वेळा ती स्टीव्हचा फोन, इमेल, बँक स्टेटमेंट्स तपासून पाहात असते. तिचा धाक एवढा आहे की बिचाऱ्या स्टीव्हला प्रत्यक्षात तर सोडाच पण टीव्हीवरच्या किंवा मासिकातल्या एखाद्या महिलेकडेही पाहण्याची बंदी आहे.

प्रवासात ३ पदार्थ कायम सोबत ठेवा- लहान मुलांसाठीही उत्तम, अजिबात थकवा येणार नाही

डेब्बीचा हा त्रास स्टीव्ह सहन करतो कारण डेब्बीला एकप्रकारचा मानसिक आजार आहे. Othello Syndrome नावाने हा आजार ओळखला जातो. या आजारात म्हणे आपला पार्टनर आपल्याला धोका देत आहे ही भीती वारंवार त्या व्यक्तीला वाटते आणि त्यातूनच तो अशी सगळी कृत्यं करतो.  

टॅग्स :सोशल व्हायरलमानसिक आरोग्य