लेडी डॉन थेरगाव क्विन (Thergaon queen) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. शिवीगाळ करून व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी तिला आधी अटक करण्यात आली आहे. या तरूणीनं सोशल मीडियावर लेडी डॉन थेरगाव नावानं सोशल मीडियावर अकाऊंट तयार केलं. या १८ वर्षीय तरूणीचं मूळ नाव साक्षी हेमंत श्रीश्रीमल असं आहे. साक्षी तिच्या साथीदारांच्या मदतीने इंस्टाग्रामवर अश्लील भाषेत धमकीचे अनेक व्हिडिओ पोस्ट करत होती. तिच्या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज आणि कमेंट्सही असायच्या.
थेरगाव क्वीनला अटक, मात्र तिच्या अकाऊंटवरून अजूनही होतायेत पोस्ट #Pune#SocialMediapic.twitter.com/QdbHnbANgu
— Lokmat (@lokmat) February 1, 2022
या तरूणीचे इंस्टाग्रामवर ११ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. मित्रांच्या मदतीने मिळून इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत, वादग्रस्त धमकीचे अनेक व्हिडिओ तयार केले इतकंच नाहीतर मुलींना बलात्काराच्या धमकी देणारे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. त्यामुळे कारवाई होणं अटळ होतं.
व्हिडीओमध्ये तिनं 'कुठला डॉन अन् कुठला कोण माझ्या नादी लागाल तर करेन ३०२' असं म्हटलं. सदर व्हिडिओमध्ये तिनं ३०२ चा केलेला उल्लेख म्हणजे खून केलेल्यानंतर लावलं जाणारं कलम आहे. घटनेचं गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी या तरूणीचा शोध घेऊन तिला अटक केली.
असे व्हिडिओ का बनवले?
पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनमध्ये साक्षी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षी ही मध्यमवर्गीय घरातील असून ती सध्या आईसोबत राहते. लाईक्सच्या लोभापोटी तिनं असे व्हिडिओ बनवल्याचं पोलिस तपासात समोर आलं. अशा व्हिडिओमुळे मुलं गुन्हेगारीकडे वळतात. त्यामुळे तिला पोलिसांकडून समज देण्यात आली आहे.