Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात घरातून पालीच जातच नाहीत? कॉफीचा करा सोपा उपाय; पाली होतील गायब

पावसाळ्यात घरातून पालीच जातच नाहीत? कॉफीचा करा सोपा उपाय; पाली होतील गायब

Viral tips for keeping lizards away : केमिकल उत्पादने कशाला? घरातून पालींना पळवून लावण्यासाठी ३ घरगुती उपाय फॉलो करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 05:54 PM2024-07-15T17:54:47+5:302024-07-15T17:55:48+5:30

Viral tips for keeping lizards away : केमिकल उत्पादने कशाला? घरातून पालींना पळवून लावण्यासाठी ३ घरगुती उपाय फॉलो करा

Viral tips for keeping lizards away | पावसाळ्यात घरातून पालीच जातच नाहीत? कॉफीचा करा सोपा उपाय; पाली होतील गायब

पावसाळ्यात घरातून पालीच जातच नाहीत? कॉफीचा करा सोपा उपाय; पाली होतील गायब

घरात पाल दिसताच किळसवाणे वाटते (Lizard). पावसाळ्याच्या दिवसात घरात पाल आणि किडे फिरतात, आणि घरातही प्रवेश करतात. ज्यामुळे घरात रोगराई देखील पसरते (Cleaning Tips). घर स्वच्छ नसेल तर घरात पाल, मच्छर आणि झुरळांचा वावर हा होतोच.

घरात एकदा का पालीने प्रवेश केला तर ती लवकर घर सोडूनही जात नाही. पालीची अनेकांना भीती वाटते. पालीपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपायांना फॉलो करा. यामुळे केमिकल उत्पादनांचा वापर न करता, घरातून पाली पळ काढतील. शिवाय घर कायम स्वच्छ राहील(Viral tips for keeping lizards away).

पालींना पळवून लावण्यासाठी ३ घरगुती उपाय

कॉफी

आपल्यापैकी बऱ्याच जणांना कॉफी आवडते. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कॉफीचा सुगंधही अनेकांना आवडतो. पण पालींना कॉफीचा गंध आवडत नाही. कॉफीच्या गंधापासून पाली दूर राहतात. यासाठी एका बाऊलमध्ये कॉफी आणि तंबाखू पावडर घेऊन मिक्स करा. त्यात थोडे पाणी मिसळून छोटे गोळे तयार करा. ज्या ठिकाणी पालींचा वावर जास्त असेल त्या ठिकाणी हे गोळे ठेवा. पाली गोळ्याच्या गंधामुळे पळ काढतील.

२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..

काळी मिरी

काळी मिरीचा वापर आपण पालींना पळवून लावण्यासाठीही करू शकता. यासाठी सर्वात आधी काळी मिरीची पावडर तयार करा. तयार पावडर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यात पाणीही भरा, ज्या ठिकाणी पालींचा वावर जास्त आहे, त्या ठिकाणी स्प्रे करा.

व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल

लसूण आणि कांदा

लसूण आणि कांद्यामुळे पदार्थाची चव वाढते. पण याच्या वापराने घरातून पाली पळ काढतील. यासाठी लसूण आणि कांद्याचा रस तयार करा. तयार रस घराच्या कोपऱ्यावर शिंपडा. कांदा लसणाच्या उग्र गंधामुळे पाली धूम ठोकत पळ काढतील.

Web Title: Viral tips for keeping lizards away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.