Join us  

२ महिन्यांच्या चिमुरड्याच्या तोंडून निघालेला पहिला शब्द ऐकून भावूक झाली आई; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 5:20 PM

Viral Video :  साधारणपणे मूल 8 ते 9 महिन्यांच्या अंतराने किंवा अकराव्या ते बारा महिन्यांच्या अंतराने बोलायला शिकते, पण जर मुलांनी अगोदर बोलण्याचा प्रयत्न केला तर ते वेळेआधीच बोलायला शिकतात.

मुलांच्या जन्मापासून ते मोठे होईपर्यंत आईच्या प्रेमाची सावली मुलांवर कायम असते. लहानपणी मुलाला बोलायला आणि खेळायला शिकवणारी आईच असते. ( 2 month old baby speaking for the first time)  साधारणपणे मूल 8 ते 9 महिन्यांच्या अंतराने किंवा अकराव्या ते बारा महिन्यांच्या अंतराने बोलायला शिकते, पण जर मुलांनी अगोदर बोलण्याचा प्रयत्न केला तर ते वेळेआधीच बोलायला शिकतात.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. वास्तविक, व्हिडिओमध्ये दोन महिन्यांचे बाळ बोलताना दिसत आहे. (2 month old baby speaking for the first time mother was shocked video going viral)

मुलाच्या तोंडातून बाहेर पडलेले पहिले शब्द प्रत्येक पालकांसाठी खूप आनंदाचे क्षण असतात. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये दोन महिन्यांचे बाळ बोलताना दिसत आहे, जे ऐकून आईच्या आनंदाला पारावार उरला नाही.

मुलाच्या तोंडून बाहेर पडलेला पहिला शब्द ऐकून आई आनंदाने ओरडली. व्हिडिओमध्ये दिसणारे या चिमुकलीचे गोंडस बोलणे आणि भोळेपणा सर्वांची मनं जिंकत आहे. व्हिडिओतील या गोंडस मुलाला पाहून इंटरनेटवरील यूजर्सनी आपल्या प्रेमळ लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर हा  व्हिडीओ भरपूर बघितला जात आहे आणि लाईक्सचा वर्षावही केला जात आहे.  हा व्हिडिओ मुलाची आई मारिसा सेंट्रोविट्ज नीलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर व्ह्यू आणि लाईक्सची मालिका सुरूच आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया