सोशल मिडियावर व्हायरल (social viral) होणारे काही काही व्हिडिओ खरोखरच खूप प्रेरणादायी असतात. ते व्हिडिओ पाहिले की नविन काही तरी करण्याची उर्मी येते. मन फ्रेश आणि रिलॅक्स होते. सध्या व्हायरल झालेला या आजीबाईंचा व्हिडिओही अगदी तसाच आहे. हा व्हिडिओ बघितला की त्या आजींचा उत्साह आणि त्यांची मोठ्या नजाकतीने डान्स करण्याची स्टाईल (dancing style of 96 years old lady) पाहून आपणही हरखून जातो. ९६ वर्षांच्या वयात एवढी उत्साही आणि एनर्जेटिक कुणी कसं असू शकतं हा प्रश्नही नक्कीच पडतो.
@Gabriele_Corno या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. Shirley Goodman असं या आजींचं नाव आहे. या ट्विटमध्येच त्यांच्या वयाचा उल्लेख ९६ वर्षे असा करण्यात आला आहे.
माधुरी दीक्षितची सुंदर हिरवी बांधणी साडी!! बघा बांधणी साडीवर कशी करायची फॅशन
पण त्यांचा उत्साह आणि नाचण्यातला चार्म पाहिला, तर कुणालाही त्यांचं हे वय खरं वाटणार नाही. या आजी नेमक्या कोणत्या देशातल्या आहेत, हे समजत नाही. पण त्यांचा व्हिडिओ मात्र जगभर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्यासोबत नृत्य करणाऱ्या इतर तरुण महिलाही आहेत. पण आजींनी मात्र असा काही जबरदस्त डान्स केला आहे, की तो पाहून त्या तरुण स्त्रियांनाही नक्कीच कॉम्प्लेक्स आला असणार.
एवढंच नाही तर आजींची कपड्यांची स्टाईलही सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांचे कपडेही अगदी ट्रेण्डी आहेत.
चष्म्याचा नंबर कमी करणारे ७ व्यायाम, तज्ज्ञ सांगतात लहान मुलांसकट मोठ्यांसाठीही फायदेशीर
काळ्या रंगाचा स्कर्ट, त्यावर काळ्या- पांढऱ्या रंगाचे लाँग टॉप, गळ्यात टपोऱ्या काळ्या मण्यांची माळ आणि कानात मस्त झुमके असा त्यांचा एकंदरीत पेहराव आहे. त्यांचा चष्मा आणि चेहऱ्यावरचं गोड हसू यामुळे त्या आणखीनच सुंदर आणि लाघवी दिसत आहेत.