तुम्ही जेव्हा केव्हा समुद्राच्या किनाऱ्यावर जाल तेव्हा तुम्हाला अनेक विदेशी महिला आंघोळ करताना आणि बिकिनीमध्ये आराम करताना दिसतील. हे परदेशात खूप सामान्य आहे. मात्र, भारतीय वेशभूषेत असलेली एक महिला समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचली, जिथे अनेक परदेशी महिला तिच्या अवतीभवती बिकिनीमध्ये फिरत होत्या. या दृष्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (A woman without a saree suddenly appeared among the girls walking around in a bikini, see the viral reaction)
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या लक्षात आले की हा समुद्रकिनारा भारताबाहेरचा दिसतो, कारण बहुतेक लोक परदेशी दिसत आहेत आणि बहुतेक परदेशी महिला बिकिनीमध्ये आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.@darshanvpathak नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
अरे काकी कहां पहुंच गई 😂😂😂 pic.twitter.com/PVl8OAupOj
— !! सरकार !! (@darshanvpathak) August 21, 2022
या व्हिडिओमध्ये मागे निळा समुद्र दिसत आहे, तर खडकाळ भागात एक प्लॅटफॉर्म आहे ज्यावरून लोकांना ये-जा करावी लागते. या प्लॅटफॉर्मवर बिकिनी परिधान केलेल्या अनेक विदेशी महिला येत-जात आहेत. या दरम्यान, भारतीय पारंपारीक पोशाख साडी परिधान करून एक महिला बीचवर फिरत आहे. ते सामान्य लोकांपेक्षा थोडे वेगळे दिसत आहे. हा क्षण कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला. साडी नेसलेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
भयंकर! सनस्क्रीन न लावता फक्त अर्धा तास उन्हात झोपली तरूणी; चेहऱ्याची अशी काही अवस्था झाली
अपलोड केल्यापासून २४ तासांत तो २ लाख ४० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि सुमारे १० हजार लोकांनी लाइक केले आहे. एका यूजरने 'अरे काकी कहां पहुंच गई अशी कमेंट केली आहे तर दुसर्या यूजरने लिहिले, 'का, ही ठिकाणे फक्त अशाच लोकांसाठी आहेत? लोक पारंपारीक कपड्यांमध्येही फिरू शकतात.'' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'जेव्हा दोन भिन्न जग एकाच विश्वात भेटले.'