Join us  

ये कुछ भी कर सकती है! मोडक्या डुगडुगत्या लाकडी पुलावरुन सुसाट गाडी पळवणारी बुलेट राणी..पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 6:26 PM

Viral Video Of Driving Two Wheeler: आपल्याकडचे कितीही भयानक रस्ते असले तरी ते या रस्त्यापुढे मात्र निश्चितच चांगले असतील.. असा हा एक डेंजर रस्ता (broken wooden bridge) आणि त्यावर गाडी चालविणारी बिंधास्त तरुणी एकदा बघाच..

ठळक मुद्देया रस्त्यावर जर कोणी गाडी चालवली तर त्याला कोणतेच काम अशक्य नाही, अशी कमेंट अनेक जणं हा व्हिडिओ पाहून करत आहेत. 

पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था होते, याचा अनुभव आपण नेहमीच दरवर्षी न चुकता घेत असतो. पण रस्ते दुरुस्ती (bad road conditions) करेपर्यंत अर्ध वर्ष निघून जातं आणि मग पुन्हा पावसाळा सुरू झाला की पहिले पाढे पंचावन्न.... आपल्याकडची रस्त्यांची ही अवस्था तर नेहमीचीच. या रस्त्यांवरून गाडी चालवताना आपली दमछाक होते, नाकीनऊ येतात. मग त्या रस्त्यांवर आपण भरपूर तोंडसुख घेतो. पण तेच आतापर्यंत ज्यांना नावं ठेवत होतो, तेच रस्ते चांगले वाटावेत, इतपत वाईट असणारा एक रस्ता सोशल मिडियावर (viral video of broken bridge) सध्या गाजतो आहे. आणि विशेष म्हणजे या रस्त्यावर एक तरुणी अगदी सफाईतदारपणे गाडी चालवते आहे..

 

हा रस्ता नेमका कोणत्या देशातला आहे की आपल्याच देशातल्या एखाद्या प्रांतातला आहे, याचा काेणताही अंदाज या व्हिडिओवरून बांधता येत नाहीये. rvcjinsta या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. Dil Dehel Gaya असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं असून खरोखरंच हा रस्ता पाहून तुम्ही सुन्न होऊन जाल, असा काही तो प्रकार आहे. या रस्त्यावरून पायी चालत जाणं सुद्धा धोक्याचं वाटत आहे, तिथे अनेक जणं अगदी सराईतपणे त्यावरून गाड्या नेत आहेत.

 

व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एका नाल्यावर एक पुल बांधण्यात आला आहे. पण तो पुल आताअतिशय मोडक्या- तोडक्या परिस्थितीत आहे. अनेक ठिकाणी तो पुल कोसळला असून त्या ठिकाणी लाकडी फळ्या टाकून तो पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी तर लाकडी फळ्याही निसटून गेल्या आहेत. शिवाय पुलावर ठिकठिकाणी मोठमोठाले भगदाड पडले आहेत.

वृद्ध आई-वडिलांना कावड यात्रेला घेऊन निघाला तरुण लेक! आजच्या श्रावणबाळाचा व्हायरल व्हिडिओ 

यावरून थोडा जरी पाय सटकला तर सरळ नाल्यात पडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवाय या पुलाच्या दोन्ही बाजूंनी कोणतीही संरक्षक भिंतही नाही. एका वेळी एकच व्यक्ती पुल ओलांडू शकते. समोरून दुसरं कोणी आलं तरी एकाला तरी पाण्यात जावंच लागणार, अशी परिस्थिती आहे. आणि अशा भयानक रस्त्यावर मात्र एक तरुणी अगदी व्यवस्थित गाडी चालवत आहे. या रस्त्यावर जर कोणी गाडी चालवली तर त्याला कोणतेच काम अशक्य नाही, अशी कमेंट अनेक जणं हा व्हिडिओ पाहून करत आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलरस्ते वाहतूकइन्स्टाग्राममहिला