Join us  

डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 5:07 PM

Trending video: इथे आंधळी कोशिंबीर खेळायची म्हटलं की दमछाक होते... तिथे हा अवलिया पहा.. चक्क डोळ्यावर पट्टी बांधून भाज्या सरसर चिरतो काय आणि भन्नाट नुडल्स बनवतो काय.. 

ठळक मुद्देत्याने भाज्या कापण्यापासून ते नुडल्स डिशमध्ये सर्व्ह करण्यापर्यंत सर्वकाही डोळ्यांवर पट्टी बांधून केले आहे...

डोळ्यांवर साधा चष्मा नसेल तर अनेक जणांना काही सुचत नाही.. त्यात जर एखाद्या स्त्री ला रेग्युलर चष्मा लावायची सवय असेल, तर चष्मा न लावता तिला तिच्याच स्वयंपाक घरात सुरळीतपणे कामही  करता येत नाही.. पण इथे तर या अवलिया माणसाने कहरच केला आहे.. डोळ्यांवर पट्टी बांधून त्याने स्वयंपाकात असा काही अतरंगी प्रयोग केला आहे की तो पाहूनच अनेक नेटकरी (social viral) मंडळींची झोप उडाली आहे..

 

तर त्याचं झालं असं की सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे. nagpur_buzz या इन्स्टाग्राम (instagram) पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इंदोरच्या साई कृपा या चायनिज सेंटरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये चायनिज विक्रेता भाज्या कापताना आणि नुडल्स करताना दिसतो आहे.... एवढंच नाही, तर त्याने भाज्या कापण्यापासून ते नुडल्स डिशमध्ये सर्व्ह करण्यापर्यंत सर्वकाही डोळ्यांवर पट्टी बांधून केले आहे...

 

सगळ्यात आधी तर तो विक्रेता डोळ्यांवर पट्टी बांधून कोबी चिरताना दिसताे आहे.. डोळे बंद असतानाही कोबी चिरण्याची त्याची स्पीड अफलातून आहे. बायकांचे पाकशास्त्रात वर्चस्व असते, असे आपल्याकडे मानले जाते.. त्यामुळे एखादी सुगरण महिला आणि हा माणूस अशी स्पर्धा जर घेतलीच तर डोळे उघडे ठेवूनही या माणसाप्रमाणे सुबक आणि जलद भाजी चिरणे एखाद्या सुगरणीला शक्य होणार नाही.. त्याचे भाजी चिरण्याचे कसब खरोखरंच लाजवाब आहे.

 

भाजी चिरल्यानंतर त्याने डोळ्यांवर पट्टी बांधूनच तापलेल्या कढईत तेल, नूडल्स, वेगवेगळे सॉस, मीठ आणि मसाले टाकले... एवढंच नाही तर अतिशय सरसपणे नूडल्स ताटात सर्व्ह देखील केल्या.. डोळ्यांवर पट्टी असूनही त्याने केलेलया नूडल्समध्ये मीठ, मसाले, सॉस यांचे प्रमाण अचूक झाले असून नूडल्स खरोखरच खूप टेस्टी झाल्याचे नूडल्स चाखणाऱ्यांनी कमेंटमध्ये टाकले आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामअन्नपाककृती