Join us  

Viral Video : बॉसच्या बोलण्याचा तिला इतका राग आला की.. सुपर मार्केटमध्ये जाऊन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 11:16 AM

Viral Video : रागाच्या भरात तिने केलेले कृत्य कॅमेरात कैद झाले असून त्यामध्ये महिलेने केलेले कृत्य एकदा पाहाच...

ठळक मुद्देबॉसच्या बोलण्याचा राग सहन न झाल्याने तरुणीने काय केले पाहाच...नोकरीवरुन काढल्याचा इतका राग आला की रागाच्या भरात तिने केले इतके नुकसान

ऑफीसमधले वातावरण चांगले असेल तर आपल्यालाही काम करायला मजा येते. पण हेच वातावरण सतत ताणलेले असेल तर आपणही वैतागून जातो. लहानसहान गोष्टीवरुन बॉस सतत आपल्याला काही ना काही बोलत असेल किंवा विनाकारण आपल्या चुका काढत असेल तर आपण वैतागून जातो. बरेचदा आपण चूक नसतानाही केवळ ‘बॉस इज ऑलवेज राइट’ हे लक्षात घेऊन काहीसे संयमाने आपण त्याचे म्हणणे ऐकूनही घेतो. पण काहीवेळा बॉसचे विनाकारण बोलणे आपल्या डोक्यात जाते आणि आपली खूप चिडचिड व्हायला लागते. (Boss fired employee she took revenge after that)अशावेळी आपला स्वत:वर, कुटुंबातील व्यक्तींवर, कामावर राग निघतो. पण बॉसचे अशाप्रकारे सतत बोलणे किंवा वागणे असह्य झाले तर मात्र आपले बॉससोबत एकतर भांडण होते नाहीतर आपण थेट राजीनामा द्यायचाही विचार करतो (Viral Video).

(Image : Google)

२५ वर्षाच्या एका तरुणीला कोणतेही कारण न देता विनाकारण नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. ही कर्मचारी एका सुपरमार्केटमध्ये काम करत होती आणि कोचतीही पूर्वसुचना न देता तिला बॉसने नोकरीवरुन कमी केले. अचानक नोकरीवरुन कमी केल्यामुळे या तरुणीला काहीसा धक्का बसला आणि रागही आला. आपला हा राग व्यक्त करण्यासाठी या तरुणीने आपण काम करत असलेल्या ठिकाणीच काहीतरी नुकसान करायचे असे ठरवले. रागाच्या भरात तिने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटीझन्सनी त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका कुठल्या देशातला आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही.

या सुपरमार्केटमध्ये असणाऱ्या अल्कोहोलच्या बाटल्या रॅकमधून खाली पाडत फोडून टाकल्या. यामुळे सगळीकडे दारु तर पसरलीच पण सगळीकडे बाटल्यांच्या काचांचाही खच झाला. सीसीटीव्हीमध्ये तिने केलेले हे कृत्य कैद झाले. ती करत असलेल्या कृतीतून तिलाही एखादी काच लागण्याची आणि इजा होण्याची शक्यता असल्याचे कदाचित तिच्या लक्षात आले नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या तरुणीला पकडले असून अशाप्रकारे नुकसान केल्याबद्दल तिला ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणीला नोकरीवरुन काढल्याने आपले नुकसान झाल्याचा राग मनात धरुन मालकाचेही नुकसान झाले पाहिजे या हेतूने तरुणीने हे कृत्य केले. 

टॅग्स :सोशल व्हायरलट्विटर