Join us  

लेक चालली सासरला पण रडत नाही, हसत-हसवत! हसऱ्या नवरीचा व्हायरल बिदाई व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 3:28 PM

बघा ही नव्या जमान्याची नवी नवरी... सासरी निघताना रडली तर नाहीच, उलट स्वत: हसली आणि सगळ्यांना हसवत मंडपातून गेली..

ठळक मुद्देही हसरी, गोड नवरी चांगलीच भाव खाऊन गेली असून नेटकरी तिच्यावर जाम फिदा झाले आहेत. 

सामान्यपणे असं असतं की मुलगी सासरी निघाली की खूप रडते... भावना कंट्रोल करणं तिला अगदी अशक्य असतं.. सासरी निघतानाच काय, पण लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतरही अनेक नवऱ्या मुलींना अश्रू आवरणं कठीण होऊन जातं. पण इथे मात्र उलटच झाली.. बघा या नवरीने नेमकी काय गंमत केली ते...

 

त्याचं झालं असं की आपल्याला माहितीच आहे सध्या भारतात सगळीकडे लग्नसराई सुरू आहे. असाच एक लग्न सोहळा होता. लग्न नेहमीप्रमाणेच आनंदात पार पडलं.. आता नवरीमुलीची पाठवणी करण्याची वेळ आली. त्यावेळी जसं प्रत्येक भारतीय लग्नात सामान्यपणे वातावरण दिसून येतं.. तसंच काहीसं वातावरण होतं. नवरीच्या जवळचे लोक भावूक झालेले होते आणि त्यांना बिदाईची वेळ आली म्हणून रडू येत होतं..

 

सगळ्यांना अपेक्षित होतं की ती आता मंडपातून निघताना नवरीही रडणार. पण झालं उलटंच.. नवरी चक्क हसत हसत तिच्या खोलीतून बाहेर आली. आजकाल अशा अनेक नवऱ्या असतात. पण मंडपातले इतर लोक रडत आहेत, हे बघून अनेकींना मग शेवटी रडू यायला लागतं. पण या नवरीला इतरांचं रडणं बघूनही काही रडू येईना. सासरच्या मंडळींसमोर अशी हसत हसत चाललेली नवरी बरी दिसते का, असं म्हणून तिच्या काही जवळच्या मैत्रिणींनी तिला रडण्याचा आग्रहदेखील केला. पण नवरी काही रडेना... 

 

शेवटी त्या नवरीनेही इतरांना रडू नका, असा सल्ला दिला. प्रत्येकाजवळ जाऊन त्याला हसवलं.. आणि हसत हसत अगदी आनंदात सगळ्यांना बाय बाय करत ती लग्न मंडपातून बाहेर पडली. या विषयीचा व्हिडियो wedding's fever या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झाला असून सगळ्यांना तो कमाल आवडला आहे. यातही हसरी, गोड नवरी चांगलीच भाव खाऊन गेली असून नेटकरी तिच्यावर जाम फिदा झाले आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामलग्न