Lokmat Sakhi >Social Viral > Viral Video: बिदाईच्या वेळी नवरीचा ढिण्चॅक डान्स!! असा डान्स पाहून वऱ्हाडी म्हणाले...

Viral Video: बिदाईच्या वेळी नवरीचा ढिण्चॅक डान्स!! असा डान्स पाहून वऱ्हाडी म्हणाले...

Viral Video of Bidai: लग्नातला बिदाईचा क्षण हा सगळ्यात अवघड.. पण हा क्षणही किती छान पद्धतीने एन्जॉय करता येतो, हे या नवरीकडे (dancing bride) पाहून शिकायला हवं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 06:39 PM2022-03-31T18:39:06+5:302022-03-31T18:40:06+5:30

Viral Video of Bidai: लग्नातला बिदाईचा क्षण हा सगळ्यात अवघड.. पण हा क्षणही किती छान पद्धतीने एन्जॉय करता येतो, हे या नवरीकडे (dancing bride) पाहून शिकायला हवं...

Viral Video: Bride's dance during her bidai... Must watch this Dancing Bride's viral video  | Viral Video: बिदाईच्या वेळी नवरीचा ढिण्चॅक डान्स!! असा डान्स पाहून वऱ्हाडी म्हणाले...

Viral Video: बिदाईच्या वेळी नवरीचा ढिण्चॅक डान्स!! असा डान्स पाहून वऱ्हाडी म्हणाले...

Highlightsनवरीचा अतिशय लाघवी डान्स पाहण्यासाठी आणि बिदाई अशी ही असू शकते, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ एकदा पहायलाच हवा.. 

जवळपास सगळ्याच भारतीय लग्नांमध्ये (Indian marriage) दिसून येणारे एक साम्य... ते म्हणजे लग्न ठरल्यापासून ते वधु- वरांच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत, सप्तपदी होईपर्यंत सगळीकडे एकच उत्साह असतो.. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. पण जसाजसा बिदाईचा प्रसंग जवळ येतो आणि नवरी तिच्या सासरी जाण्याची तयारी सुरू होते, तसतसं वधू पक्षातले चेहरे हिरमुसू लागतात. 

 

नवरीची आणि तिच्या आई- वडीलांची आणि जवळच्या नातलगांची अवस्था अशी असते की, त्यांच्याकडे पाहूनच एखाद्याला रडू कोसळेल... जवळपास सगळ्याच भारतीय लग्नांमध्ये होणारा हा सीन जेव्हा एखाद्या लग्नात दिसतच नाही, तेव्हा ते लग्न मग सगळ्यांपेक्षा वेगळं ठरतं... असंच एक लग्न नुकतंच पार पडलं... त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांना व्हिडिओतली बिंधास्त नवरी भारीच आवडून गेली आहे. 

 

bridal_lehenga_designn and wedding.lehenga या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर (instagram share) करण्यात आला आहे. यामध्ये असं दिसत आहे की एका नवरीची बिदाई सुरू असून ती कारमध्ये मागच्या बाजूला बसली आहे. गाडीत एक मस्त उडत्या चालीचं म्युझिक सुरू असून त्यावर ही नवरी मस्तपणे बसल्या- बसल्याच थिरकताना दिसते आहे. आधी या नवरीने घुंघट घेऊन् संपूर्ण चेहरा झाकून टाकलेला होता. नाचत नाचत ती हळूहळू घुंघट वर करते आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचं हास्य, प्रसन्नता सगळ्यांनाच मोहित करते... नवरीचा अतिशय लाघवी डान्स पाहण्यासाठी आणि बिदाई अशी ही असू शकते, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ एकदा पहायलाच हवा.. 

 

Web Title: Viral Video: Bride's dance during her bidai... Must watch this Dancing Bride's viral video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.