Join us  

Viral Video : इंजिनिअर्सना लाजवेल चिमुरड्याचा कपड्यांची घडी करण्याचा जुगाड; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 2:32 PM

Viral Video : हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

सोशल मीडियावर तुम्ही जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. एका चिमुरड्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही  कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांचे जुगाड एवढे जबरदस्त असतात की ते पाहून मोठमोठे इंजिनीअरही थक्क होतात. असाच एक जुगाड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आहे. (Child made a wonderful jugaad to fold clothes even the engineers would be stunned to see)

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक लहान मूल कपडे घालण्यासाठी खूप जुगाड करत आहे. मुलाचे वय इतके कमी आहे की त्याचा जुगाड बघून तुम्ही म्हणाल  की एवढ्या लहान वयात एव्हढा शहाणपणा कुठून येतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही मन प्रसन्न होईल. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलाने एक कार्डबोर्ड अशा प्रकारे कापला आहे की तो कपडे व्यवस्थित फोल्ड करू शकेल. यानंतर, त्या पुठ्ठ्याचा वापर करून तो आपले कपडे वेगाने दुमडतो. या  तंत्राच्या साहाय्याने व्यवस्थित कपडे दुमडले जातात. 

हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर हॅक्स क्रिएटिव्ह नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून लोक त्या मुलाचे प्रचंड कौतुक करत आहेत. सोशल मीडिया यूजर्स मुलाला सुपर क्रिएटिव्हचा टॅग देत आहेत. मुलाचा जुगाड पाहून एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, 'खूप छान आयडिया'

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया